‘रामायण’ फेम Dipika Chikhlia यांच्या मॉर्डन लूकला नेटकऱ्यांचा विरोध; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ
'रामायण' मालिकेत 'सीता' ही भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखालिया यांचा मॉर्डन लूक सोशल मीडियावर व्हायरल; त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कडाडून विरोध
Dipika Chikhlia New Post : अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत मुख्य भूमिका साकारात चाहत्यांच्या मनात घर केलं. दीपिका चिखालिया यांनी ‘रामायण’ मालिकेत सीता या भूमिकेला योग्य न्याय दिला. आज देखील चाहते त्यांना दीपिका चिखालिया या नावाने नाहीतर, सीता याच नावाने ओळखतात. दीपिका चिखालिया कायम त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. ‘रामायण’ मालिका आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. याच कारणामुळे मालिकेत सीता ही भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखालिया देखील चर्चेत असतात. एवढंच नाही तर, दीपिका सोशल माडियावर देखील कायम सक्रिय असतात.
सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दीपिका चिखालिया कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. पण आता एक व्हिडीओ पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. आता दीपिका चिखालिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या मॉर्डन लूकमध्ये दिसत आहेत. पण दीपिका यांचा मॉर्डन लूक काही चाहत्यांना आवडला, तर काही नेटकऱ्यांनी मात्र दीपिका यांच्या मॉर्डन लूकला कडाडून विरोध केला आहे.
View this post on Instagram
दीपिका यांच्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी सुंदर आणि गॉर्जियस म्हणत कमेंट केली आहे. तर एका युजरने लिहिलं ‘आम्ही तर तुम्हाला दुसऱ्या रुपात पाहिलं आहे, पण तुमचं रुप तर वेगळंच आहे.’ तर अन्य काही युजर्सने मॉर्डन कपडे घालून सीतामातेची प्रतिमा खराब करू नये… असं लिहिलं आहे. सध्या दीपिका चिखालिया यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दीपिका यांनी मोरपंखी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला. शॉर्ट ड्रेस घालून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘ज्याप्रकारे तुम्ही सगळ्यांकडे पाहून हासता… असं प्रत्येक जण करत नाही… म्हणून सावध राहा…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र दीपिका यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.
दीपिका यांच्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आजही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी रामायण ही एक मालिका आहे. रामायण ही एक अशी मालिका आहे, जी आजही लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील आवडीने पाहातात. रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली.
मालिकेत दीपिका चिखालिया यांच्या सोबत अरुण गोविल, सुनील लहरी, अरविंद त्रिवेदी, दारा सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. महत्त्वाचं म्हणजे रामायण मालिकेतील सीता हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.