‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांच्यावर का आली बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याची वेळ?

| Updated on: Jul 15, 2024 | 4:01 PM

Dipika Chikhlia: अभिनेत्री दीपिका दिखलिया यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे 'ही' गोष्ट, अभिनेत्रीवर कायम आली होती बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याची वेळ, सध्या सर्वत्र दीपिका चिखलिया यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांच्यावर का आली बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याची वेळ?
Follow us on

अभिनेत्री दीपिका चिखलिया आता झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘रामायण’ मालिकेत ‘सीता’ या भूमिकेला न्याय दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. ‘रामायण’ मालिकेला संपून आज अनेक वर्ष झाली आहेत. पण कोणीही मालिका आणि दीपिका यांना विसरु शकलेलं नाही. ‘रामायण’ मालिकेत काम करण्यापूर्वी दीपिका यांनी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की ‘रामायण’ मालिकेत सीता यांची भूमिका साकारण्यापूर्वी दीपिका यांनी बी – ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

दीपिका यांनी करियरची सुरुवात ‘सुन मेरी लैला’ सिनेमातून केली. दीपिका यांचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्यांना सिनेमाकडून अपेक्षा होत्या. पण सिनेमा फ्लॉप ठरला. पहिला सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर दीपिका यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण दीपिका यांचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला नाही. अशात दीपिका यांना सिनेमात काम मिळणं बंद झालं. त्यानंतर बॉलिवूड सोडून दीपिका यांनी स्वतःचा मोर्चा टीव्ही विश्वाकडे वळवला.

दीपिका यांनी ‘विक्रम बेताल’, ‘पेइंग गेस्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काय केलं. पण मालिकांध्या दीपिका यांचं मन रमत नव्हतं. याच कारणामुळे दीपिका यांनी बी – ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. दीपिका यांनी ‘चीख’ , ‘रात के अंधेरे में’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं. सिनेमाच्या कथेची गरज म्हणून दीपिका यांनी अनेक बोल्ड सीन देखील दिले. तरुणपणी दीपिका दिसायला प्रचंड सुंदर होत्या, पण तरी देखील बॉलिवूडमध्ये त्यांना यश मिळालं नाही.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर दीपिका चिखलिया आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दीपिका यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी दीपिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दीपिका यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दीपिका यांनी 1991 मध्ये गुजरात येथील उद्योजक हेमंत टोपीवाला यांसोबत लग्न केलं. दीपिका यांना दोन मुली देखील आहेत. मुलींच्या सौंदर्यापुढे दीपिका यांचं सौंदर्य फेल आहे. त्यांच्या मुलींचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.