Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैकेयीच्या रुपात लारा दत्ता, दशरथाच्या अवतारात अरुण गोविल; ‘रामायण’च्या सेटवरील लूक व्हायरल

अभिनेता रणबीर कपूरने आणखी एक आव्हानात्मक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी कमालिची गुप्तता पाळण्यात येत असली तरी सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कैकेयीच्या रुपात लारा दत्ता, दशरथाच्या अवतारात अरुण गोविल; 'रामायण'च्या सेटवरील लूक व्हायरल
Arun Govil and Lara DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 12:38 PM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या मुंबईत होत आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुरुवारी लीक झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये ऑनस्क्रीन रामनगरीची झलक पहायला मिळाली होती. त्यानंतर आता त्यातील कलाकारांचा लूक लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर ‘रामायण’ या चित्रपटातील अरुण गोविल, लारा दत्ता आणि शिबा चड्ढा यांचे लूक व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीच्या रुपात पहायला मिळतेय. तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत दिसत आहेत. अभिनेत्री शिबा चड्ढा या फोटोंमध्ये मंथराच्या लूकमध्ये पहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी प्रचंड पैसा खर्च केला आहे. त्यामुळे आधीच सर्व कलाकारांचे लूक लीक होत असताना अनेकांनी सेटवर मोबाइलच्या वापरावर बंदी ठेवावी, अशी मागणी केली आहे. काही व्हायरल फोटोंमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारीसुद्धा दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘रामायण’ चित्रपटासाठी भव्यदिव्य सेट उभारण्याकरिता निर्मात्यांनी 11 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये बनवला जाणार असल्याचं कळतंय. यातील कलाकारांविषयी बोलायचं झाल्यास, अभिनेता रणबीर कपूर यात श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय.

चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.

यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.