Ramanand Sagar यांच्या कुटुंबातील लेकीकडून नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप
'रामायण' मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या कुटुंबातील लेकीने नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर केले लैंगिक छळाचे आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली...
मुंबई | ‘रामायण’ मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या कुटुंबातील लेक साक्षी चोप्रा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. साक्षी कायम तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. पण आता साक्षी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. साक्षीने सोशल करेंसी’ शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे. ज्यामुळे रामानंद सागर यांच्या नातवाची मुलगी साक्षी चर्चेत आहे. साक्षीने ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) च्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.. सध्या सर्वत्र साक्षी चोप्रा हिची चर्चा रंगत आहे.
साक्षीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘नेटफ्लिक्स इंडिया शोमध्ये माझ्यावर लैंगिक छळ झाले. माझ्या कपडे घालण्याची स्टाईल वेगळी असल्यामुळे त्यांना असं वाटलं मला सगळं चालेल.. मी मान्य केलेल्या करारामध्ये फक्त दिवसातून एक वेळा कॉल करण्याचं वचन दिलं होतं. पण @netflix_in ने एक वर्षापेक्षा जास्त काळ माझा पाठलाग केला…’
‘सुरुवातील मी शोसाठी नकार दिल्यामुळे शोच्या वरिष्ठांनी बैठक बोलावली आणि नक्की शोमध्ये काय असेल याची खात्री मला करुन दिली. शोमध्ये सक्रिय होण्यासाठी @showrunnerchad हा मला सतत फोन करत होता. पण त्यांनी मला शोबद्दल योग्य माहिती दिली नाही. शोमध्ये फक्त गेम आहेत.. असं त्यांनी मला सांगितलं…’
View this post on Instagram
पुढे साक्षी म्हणाली, ‘पण त्यांनी कधी जेवण देखील दिलं नाही. कॅमेऱ्याच्या मागे देखील नाही..’ शिवाय शोच्या निर्मात्यांनी साक्षीला तिच्या आईसोबत देखील संपर्क करु दिला नाही. जेव्हा साक्षीने लैंगिक छळ झाल्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रॉडक्शन टीमने साक्षीचा फोन जप्त केला. शिवाय साक्षीला आईसोबत देखील संपर्क साधू दिला नाही.
‘माझ्या आईला शोमध्ये काय चाललं आहे हे माहित देखील नव्हतं, कारण ते प्रत्येक कॉल आणि मेसेजवर लक्ष ठेवून होते. जेव्हा माझ्यासोबत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्मात्यांनी माझ्या हातातून फोन खेचून घेतला.. मी कोणते कपडे घालणं पसंत करते, हे महत्त्वाचं नाही. माझ्या विनयशीलतेचा सार्वजनिकपणे अपमान करण्याची परवानगी मी कोणाला देत नाही.. सांगितलेले टास्क पूर्ण न केल्यास जेवायला देणार नाही… अशी धमकी मिळत होती…’ सध्या सर्वत्र साक्षी चोप्रा हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.