अयोध्येत पोहोचले ‘रामायण’ मालिकेतील राम – सीता अन् लक्ष्मण; जंगी स्वागताचा व्हिडीओ व्हायरल

राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी टीव्ही, चित्रपट, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये हेमा मालिनी, अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार, आमिर खान, आयुषमान खुराना यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

अयोध्येत पोहोचले 'रामायण' मालिकेतील राम - सीता अन् लक्ष्मण; जंगी स्वागताचा व्हिडीओ व्हायरल
अयोध्येत 'रामायण' मालिकेतील कलाकारांचं जंगी स्वागत Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 3:43 PM

अयोध्या : 17 जानेवारी 2024 | 22 जानेवारीचा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. यादिवशी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. यादिवशी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. यादरम्यान रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील मुख्य कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत. मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार म्हणजेच अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांचं अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. तर अरुण गोविल आणि सुनील लहरी हे पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. या तिघांभोवती लोकांची बरीच गर्दी पहायला मिळतेय. काहींनी हातात झेंडेसुद्धा घेतले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी सुनील लहरी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नसल्याची तक्रार केली होती. मात्र आता त्यांना अयोध्येत अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्यासोबत पाहून चाहतेसुद्धा खुश झाले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांना हे तीन दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळत आहेत. रामायण या मालिकेची प्रचंड लोकप्रियता आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. त्यावेळी मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले होते.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी 8000 पेक्षाही अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या मंदिरात पूजा कशी होणार, त्याचं वैशिष्ट्य काय, याबद्दल जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी त्याठिकाणी परफॉर्म करणार आहेत.

या महिन्यासाठी अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत. अयोध्या राम मंदिराच्या 170 किलोमीटरच्या परिघात लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये हॉटेल्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे एमडी आणि संस्थापक म्हणाले की, “त्यांच्या हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 85 हजारांच्या पुढे गेले आहे.”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.