‘आदिपुरुष’च्या टीझरवर रामायणातील लक्ष्मणाची परखड प्रतिक्रिया, म्हणाले..

सुनील लहरी यांनी सांगितला रामायण आणि आदिपुरुष यांच्यातील मोठा फरक

'आदिपुरुष'च्या टीझरवर रामायणातील लक्ष्मणाची परखड प्रतिक्रिया, म्हणाले..
'आदिपुरुष'च्या टीझरवर रामायणातील लक्ष्मणाची परखड प्रतिक्रियाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 6:43 PM

रामानंद सागर यांच्या 1987 मध्ये आलेल्या ‘रामायण’ (Ramayan) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri) यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून पुन्हा एकदा रामायणाची चर्चा होत आहे. आता सुनील लहरी यांनी आदिपुरुषच्या टीझरवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या टीझरमधील VFX हे पचवण्यास अवघड असल्याचं ते म्हणाले. आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्यातील VFX आणि CGI वरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या टीझरला ट्रोल केलं आहे.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाले, “खरंच, त्यातील VFX पचवण्यास अवघड आहेत. आमच्या रामायणाच्या वेळी तंत्रज्ञानासोबत काम करणं खूपच नवीन होतं. त्यातून आम्ही सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत ती मालिका बनवली होती. म्हणूनच आता 35 वर्षांनंतरही लोक मालिकेचं कौतुक करतात. आताच्या तरुण पिढीला त्यातील इफेक्स्ट कार्टूनसारखे वाटत नाहीत. आतासारखं आधुनिक तंत्रज्ञान त्यावेळी असतं तर रामानंद सागर यांनी अजून चांगली मालिका बनवली असती.”

हे सुद्धा वाचा

“आधी सगळं मॅन्युअली काम व्हायचं, आता सगळं प्रीसेट असतं. त्यामुळे आताच्या लोकांना त्यात काही प्रयत्नच करायचे नसतात. एका दृश्यामध्ये जेव्हा हनुमानजी हे राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर उचलतात, ते शूट करण्यासाठी आम्हाला चार दिवस लागले होते. प्रत्येक दृश्यातील बारकावे आम्ही पाहायचो”, असं ते पुढे म्हणाले.

आदिपुरुषमध्ये सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. तर प्रभास हा रामाच्या भूमिकेत आहे. क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. तर रावमाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.