Rana Daggubati: इंडिगो एअरलाइनवर भडकला ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती; विमानप्रवासादरम्यान हरवलं सामान

इंडिगो एअरलाइनबद्दल राणा डग्गुबतीचं ट्विट व्हायरल; अखेर कंपनीने मागितली माफी

Rana Daggubati: इंडिगो एअरलाइनवर भडकला 'बाहुबली' फेम राणा डग्गुबती; विमानप्रवासादरम्यान हरवलं सामान
Rana DaggubatiImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 9:24 AM

हैदराबाद: ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबतीला विमान प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. याविषयी त्याने ट्विट करत इंडिगो एअरलाइन्सवर राग व्यक्त केला आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वांत वाईट एअरलाइन अनुभव असं लिहित त्याने इंडिगोचा फोटो पोस्ट केला आहे. राणा त्याच्या कुटुंबीयांसोबत बेंगळुरूला जात होता, तेव्हा ही घटना घडली. यावेळी राणाचं सामान हरवलं आणि ते कुठे आहे याची माहिती एअरलाइनच्या स्टाफलाही नव्हती.

नेमकं काय घडलं?

‘आतापर्यंतचा सर्वांत वाईट अनुभव. इंडिगोला त्यांच्या फ्लाइट्सच्या वेळेची माहिती नाही, माझं सामान हरवलंय आणि ते ट्रॅक करता येत नाहीये. इतकंच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही याविषयीची काहीच माहिती नाही. यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं’, अशा शब्दांत राणाने तीव्र संताप व्यक्त केला.

इंडिगो एअरलाइन कंपनीच्या ब्रीदवाक्यांवरूनही राणाने उपरोधिक पोस्ट लिहिली. ‘आमचे इंजीनिअर्स दररोज सुरक्षित आणि त्रासमुक्त उड्डाणं सुनिश्चित करतात, तेही नॉन स्टॉप’, अशी इंडिगोच्या कंपनीची एक पोस्ट होती. त्यावर राणाने लिहिलं, ‘कदाचित इंजीनिअर्स चांगले असतील पण स्टाफला कशाचीही माहिती नसते.’

हे सुद्धा वाचा

राणाच्या या ट्विट्सनंतर अखेर इंडिगो कंपनीकडून माफी मागण्यात आली. ‘तुमच्या झालेल्या त्रासाबद्दल आणि असुविधेबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही लवकरात लवकर तुमचं सामान परत मिळवण्याचा प्रयत्न करू. आमची टीम त्यासाठी काम करतेय’, असं उत्तर इंडिगोकडून देण्यात आलं.

राणाला त्याच्या कुटुंबीयांसोबत बेंगळुरूला जायचं होतं तेव्हा ही घटना घडली. हैदराबाद एअरपोर्टवर राणसोबत इतर प्रवाशांनाही सांगितलं गेलं की विमानातील काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दुसरी फ्लाइट निवडावी लागेल. हे सर्व चेन-इन केल्यानंतर घडलं.

इंडिगो एअरलाइन कंपनीवर सेलिब्रिटींकडून टीका झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेत्री पूजा हेगडेनंही सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्टाफच्या वागणुकीविषयी तक्रार केली होती. इंडिगोचा स्टाफ विनाकारण आमच्याशी उद्धट आणि धमकीच्या स्वरात बोलत होता, असं ट्विट पूजाने केलं होतं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.