बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची रॉयल लाईफ, कोट्यवधी रुपये फक्त विजेचं बिल भरतात, आकडा जाणून व्हाल थक्क
कोट्यवधी रुपये फक्त विजेचं बिल भरतात बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी; एवढ्या रुपयांमध्ये सामान्य व्यक्ती एक घर नक्की घेईलच...
मुंबई | बॉलिवूड सेलिब्रिटींची रॉयल लाईफ स्टाईल कायम चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. महागडे कपडे, महागड्या वस्तू, आलिशार घरे, गडगंज संपत्ती, महागड्या गाड्यांचं कलेक्शन… इत्यादी चैनीच्या गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. सेलिब्रिटींची नो मेकअप लूक, एअरपोर्ट लूक, मॉर्डन लूक, पारंपरिक लूक… सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सेलिब्रिटींच्या रॉयल लाईफ स्टाईल आणि महागड्या वस्तूंची तर कायम चर्चा रंगत असते. पण सेलिब्रिटी वर्षाला कोट्यवधी रुपये विजेचं बिल भरतात.
अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरुख खान या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. शिवाय बॉलिवूडच्या खान कुटुंबाच्या आयुष्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. रिपोर्टनुसार, दर महिन्याला सेलिब्रिटींच्या विज बिलाचे आडके बदलत असतात. पण आता समोर आलेले आकडे मात्र हैराण करणारे आहेत.. तर जाणून घेवू महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यापर्यंत सेलिब्रिटी महिन्याला किती विज बिल भरतात…
अभिनेत्री आलिया भट्ट – अभिनेता रणबीर कपूर – आलिया भट्ट – रणबीर कपूर हे बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल आहे. आलिया आणि रणबीर महिन्याला तब्बल १० ते १२ लाख रुपये विजेचं बिल भरतात.
अभिनेत्री कतरिना कैफ – अभिनेता विकी कौशल – विकी कायम कतरिना हिच्यासोबत थाटलेल्या संसाराबद्दल बोलत असतो.. विकी आणि कतरिना महिन्याला तब्बल ८ ते १० लाख रुपये विजेचं बिल भरतात.
अभिनेत्री दीपिका पादुकोण – अभिनेता रणवीर सिंग – दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग महिन्याला तब्बल ८ ते १० लाख रुपये विजेचं बिल भरतात. दोघे कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.
अभिनेता सलमान खान – बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान देखील महिन्याला लाखो रुपये विजेचं बिल भरतो. सलमान खान एका महिन्याला तब्बल २३ लाख रुपये विजेचं बिल भरतो…
अभिनेता शाहरुख खान – शाहरुख खान महिन्याला वीस तीस लाख रुपये नाही, तब्बल ४३ लाख रुपये विजेचं बिल भरतात. एवढ्या रुपयांमध्ये सामान्य माणूस एक घर तर नक्की विकत घेवू शकतो. शाहरुख खान जगातील श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
अभिनेता सैफ अली खान – सैफ अली खान देखील कायम त्याच्या खासगी आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता महिन्याला तब्बल ३० लाख रुपये विजेचं बिल भरतात. अभिनेत्याचं घर देखील प्रचंड मोठं आहे.
अभिनेता आमिर खान – इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत आमिर खान कमी विजेचं बिल भरतो. अभिनेता दर महिन्याला ८ ते ९ लाख रुपये विजेचं बिल भरतो. अभिनेत्याची संपत्ती प्रचंड मोठी आहे.
महानायक अमिताभ बच्चन – बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत असलेल्या ‘जलसा’ या बंगल्यात राहतात. बिग बी वर्षाला तब्बल २२ लाख रुपये विज बिल भरतात. शिवाय बच्चन कुटुंबाच्या रॉयल आयुष्याच्या देखील सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात.