Ranbir Alia | ‘रणबीरचं वागणं आलियाला आवडलं नाही हे स्पष्ट दिसतंय’; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

रणबीर आणि आलिया सध्या त्यांच्या आगामी 'रामायण' या चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. नितेश तिवारी आणि मधू मंटेना यांच्या 'रामायण' या चित्रपटात रणबीर श्रीराम तर आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ranbir Alia | 'रणबीरचं वागणं आलियाला आवडलं नाही हे स्पष्ट दिसतंय'; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 3:18 PM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा मुंबई एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या एअरपोर्ट लूकमुळे नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. आपल्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर रणबीर पत्नी आलियासोबत दुबईला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. गुरुवारी रात्री हे दोघं एअरपोर्टवर दिसले, मात्र यावेळी रणबीरच्या वागणुकीमुळे आलिया थोडीशी वैतागलेली पहायला मिळाली. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीर पापाराझींसमोर येऊन फोटोसाठी पोझ देतात. मात्र रणबीर जेव्हा आलियाच्या खांद्यावर हात टाकतो, तेव्हा ती अनकम्फर्टेबल झालेली पहायला मिळते. यावरूनच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. आलियाच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी दोघांमधील भांडणाचा अंदाज व्यक्त केला. ‘ज्या पद्धतीने रणबीरने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला, तिला ते अजिबात आवडलं नाही हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘आलियाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळतंय की ती अनकम्फर्टेबल आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

रणबीर आणि आलिया सध्या त्यांच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. नितेश तिवारी आणि मधू मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर श्रीराम तर आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय आलियाचा पहिला हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा व्हिडीओ

करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून आलिया भट्टला लाँच केलं होतं. त्यानंतर तिने ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘राजी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.