मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने फार कमी वोळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. जियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. आज देखील अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे आणि सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. फक्त ३ सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं. जियाच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आज जिया आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. जिया हिचा जन्म न्यूयॉर्क याठिकाणी झाला होता. अभिनेत्रीचं शिक्षण लंडनमध्ये झालं. परदेशात शिक्षण झालेल्या जियाला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. त्यामुळे जिया मायानगरी मुंबई याठिकाणी आली.
मुंबईमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलं आणि बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जियाने स्क्रिन देखील शेअर केली. चाहते अभिनेत्रीला जिया या नावाने ओळखत असले तरी तिचं खरं नाव नफीसा रिझवी खान असं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदललं होतं. पण तिने पुन्हा नफीसा म्हणून ओळख निर्माण केली.
परदेशातून मोठी स्वप्न घेवून मुंबईमध्ये आलेल्या जिया खान हिने ३ जून २०१३ रोजी स्वतःचं आयुष्य संपवलं. जियाच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला. जियाच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्री थक्क झाली होती. स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी अभिनेत्री एक पत्र लिहीलं होतं. ज्यामध्ये रिलेशनशिनपमध्ये आनंदी नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.
अभिनेत्रीच्या निधानानंतर जियाच्या आईने लेकीचा बॉयफ्रेंड सूरज पंचोली याच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे सूरजला पोलिसांनी अटक देखील केली होती. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सूजर पंचोली याची १० वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली. जियाने स्वतःची स्वप्न मागे ठेवत जगाचा निरोप घेतला.
जियाने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ सिनेमात काम केलं. अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘गजनी’ सिनेमात काम केल. शिवाय जिया अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘हाउसफुल’ सिनेमात देखील झळकली. फार कोणाला माहिती नसेल पण अभिनेत्री तिच्या चौथ्या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार होती.
जिया हिच्या चौथ्या सिनेमाचं नाव होतं ‘आप का साया…’ सिनेमात जिया रणबीर कपूर याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार होती. पण सिनेमा कधीच पूर्ण होवू शकला नाही. नाही तर मोठ्या पडद्यावर जिया आणि रणबीर यांची जोडी प्रेक्षकांना पती – पत्नीच्या रुपात अनुभवता आली असती.