अयोध्येत पोहोचलेल्या रणबीर-कतरिनाच्या फोटो-व्हिडीओची खास चर्चा
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रणबीर कपूर आणि विकी कौशल सपत्नीक अयोध्येला पोहोचले. रणबीर-आलिया आणि विकी-कतरिना यांचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रणबीर आणि कतरिनाला एकत्र पाहून नेटकरी कमेंट्स करत आहेत.
अयोध्या : 22 जानेवारी 2024 | राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी केवळ अयोध्याच नव्हे तर सगळा देश सजला आहे. देशभरात रामभक्तीचं वातावरण पहायला मिळतंय. मुंबई, ठाण्यासह देशभरातील अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, साधुसंतांच्या साक्षीने प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी एकाच विमानातून अयोध्येला पोहोचले. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. अयोध्येत पोहोचल्यानंतर रणबीर-आलिया आणि कतरिना-विकीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
विमानातून अयोध्येला पोहोचल्यानंतर या सर्व सेलिब्रिटींनी फोटोसाठी एकत्र पोझ दिला आहे. या फोटोमध्ये रणबीर-आलिया आणि कतरिना-विकी बाजूबाजूला उभे असल्याचं पहायला मिळत आहे. तर एका व्हिडीओमध्ये हे चौघं जण ई-रिक्षाने मंदिरापर्यंत जाताना दिसत आहेत. या ई-रिक्षामध्ये विकी-कतरिना पुढच्या बाजूला आणि त्यांच्या मागे रणबीर-आलिया बसलेले दिसत आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये हे चौघं जण मंदिराकडे चालत जाताना दिसत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र या ऐतिहासिक सोहळ्यात जेव्हा रणबीर कपूर आणि विकी कौशल सपत्नीक सहभागी झाले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. रणबीर आणि कतरिना एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच फ्रेममध्ये या दोघांना पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. सुमारे 40 मिनिटांपर्यंत प्राणप्रतिष्ठेच्या विधी पार पडल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. या कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश असला तरी जगभरातील कोट्यवधी लोकांनी टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमातून हा ऐतिहासिक सोहळा अनुभवला. देशभरातील विविध मंदिरांमध्येही आरत्या, घंटानाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.