‘रश्मिकाला मारहाण सुरु असताना इतर मुली…’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध गीतकाराचं खळबळजनक वक्तव्य
Animal : 'आजच्या पिढीतील स्त्रियांची दया येते कारण त्यांच्यासाठी भयानक पुरुष...', रश्मिका मंदाना हिची अवस्था पाहिल्यानंतर प्रसिद्ध गीतकाराकडून नाराजी व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लोकप्रिय गीतकाराच्या वक्तव्याची चर्चा...

मुंबई | 4 मुंबई 2023 : ‘आजच्या पिढीतील मुली चित्रपटगृहात बसून रश्मिका हिला मारहाण सुरु असताना जेव्हा टाळ्या वाजवत होत्या तेव्हा मी समानता या विचारांना श्रद्धांजली दिली… ‘ असं वक्तव्य लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांनी केलं आहे. एक्सवर (ट्विटर) स्वानंद यांनी ‘ॲनिमल’ सिनेमावर निशाणा साधला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आजच्या पिढीतील महिलांवर दया वाटते… असं देखील स्वानंद किरकिरे म्हणाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्वानंद यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, त्यांनी अभिनेता रणबीर कपूर याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे…
स्वानंद किरकिरे म्हणाले, ‘शांताराम यांचा औरत, गुरु दत्त यांचा साहेब बीवी और गुलाम, हृषिकेश मुखर्जी यांचा अनुपमा, श्याम बेनेगल यांचा अंकुर, भूमिका, केतन मेहता यांचा मिर्च मसाला, सुधीर मिश्रा यांचा मैं जिंदा हूं, गौरी शिंदे यांचा इंग्लिश विंग्लिश , विकास बहल यांचा क्वीन शूजीत सरकार यांचा पीकू, यांसारख्या अनेक सिनेमांनी मला महिलांचे अधिकार आणि स्वायत्तताचं सन्मान ठेवयला शिकवलं.




शांतराम की – औरत , गुरुदुत्त की – साहब बीवी और ग़ुलाम , हृषीकेश मुखर्जी की – अनुपमा , श्याम बेनेगल की अंकुर और भूमिका , केतन मेहता की मिर्च मसाला , सुधीर मिश्रा की मैं ज़िंदा हूँ , गौरी शिंदे की इंगलिश विंगलिश , बहल की क्वीन सुजीत सरकार की पीकू आदि , हिंदुस्तानी सिनेमा
— Swanand Kirkire (@swanandkirkire) December 2, 2023
‘सर्व काही समजून घेतल्यानंतरही, आजच्या पिढीत जुन्या विचारांमुळे अनेक उणिवा आहेत. मी यशस्वी झालो की नाही माहीत नाही, पण आजही मी स्वत:ला सुधारण्याचा सतत प्रयत्न करत असतो. यासाठी सिनेमाचे आभार.’ पुढे स्वानंद म्हणाले, ‘आजच्या पिढीतील स्त्रियांची दया येते. आता तुमच्यासाठी नवीन पुरुष तयार होत आहे, जो अधिक भयानक आहे.’
‘पुरुष जो तुमचा आदर करत नाही आणि तुमच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या पिढीतील मुली चित्रपटगृहात बसून रश्मिका हिला मारहाण सुरु असताना जेव्हा टाळ्या वाजवत होत्या तेव्हा मी समानता या विचारांना श्रद्धांजली दिली. सिनेमा पाहिल्यानंतर मी उदास, निराश होऊन घरी आलो.’ असं देखील स्वानंद किरकिरे म्हणाले.
सिनेमातील रणबीर याच्या एका डायलॉगनर स्वानंद यांची नाराजी
स्वानंद म्हणतात, ‘रणबीरचा डायलॉग ज्यामध्ये तो अल्फा पुरुषाला परिभाषित करतो आणि म्हणतो की जे पुरुष अल्फा बनू शकत नाहीत, ते फक्त स्त्रियांचं सुख मिळवण्यासाठी कवी बनतात आणि चंद्र-तारे तोडण्याची वचने देऊ लागतात. मी कवी आहे, जगण्यासाठी कविता करतो. माझ्यासाठी काही जागा आहे का?’
‘एक सिनेमा प्रचंड कमाई करत आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासला ठेच पोहोचत आहे. माझ्या मते ‘ॲनिमल’ सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीचं भविष्य भयानक आणि धोकादायक मार्गावर घेऊन जात आहे…. असं वक्तव्य लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांनी केलं.