खऱ्या आयुष्यातही ऋषी कपूर यांच्यासोबत रणबीरचं ‘ॲनिमल’सारखं नातं? व्हिडीओवरून नेटकऱ्यांचा सवाल

अभिनेता रणबीर कपूर आणि त्याचे वडील ऋषी कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओ ऋषी कपूर असं काही म्हणतात, जे ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पहा हा व्हिडीओ..

खऱ्या आयुष्यातही ऋषी कपूर यांच्यासोबत रणबीरचं 'ॲनिमल'सारखं नातं? व्हिडीओवरून नेटकऱ्यांचा सवाल
रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ चर्चेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 12:53 PM

मुंबई : 13 डिसेंबर 2023 | बापलेकाच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना ‘ॲनिमल’ या चित्रपटात पहायला मिळतेय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांनी पितापुत्राची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत रणबीरने सांगितलं होतं की शूटिंगदरम्यान त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण यायची. आता रणबीर आणि त्याचे वडील ऋषी कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातही रणबीरचं त्याच्या वडिलांसोबत ‘ॲनिमल’ चित्रपटात दाखवल्यासारखंच नातं होतं, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

एका मुलाखतीत रणबीरने ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी शूटिंग करतानाचा अनुभव सांगितला. “मी जेव्हा कधी दिग्दर्शिक संदीप यांना भेटायचो, तेव्हा त्यांच्याकडे माझ्या भूमिकेसाठी संदर्भ मागायचो. मी कधीच अशा प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घेतला नाही. शूटिंग करताना मला माझ्या वडिलांची अनेकदा आठवण आली. मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने बोलायचे, ते फार भावूक आणि रागीट व्यक्ती होते. म्हणूनच मी माझी भूमिका माझ्या वडिलांप्रमाणे साकारण्याचा प्रयत्न केला”, असं तो म्हणाला होता.

हे सुद्धा वाचा

आता सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये रणबीर एका कार्यक्रमात मीडियासमोर बोलताना दिसत आहे. त्याचवेळी त्याचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर तिथे येतात आणि रणबीर त्यांची गळाभेट घेतो. त्यानंतर ऋषी कपूर म्हणतात, “सर्वांत आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही एकाच घरात राहत नाही. वेगवेगळे राहतो. त्यामुळे हा फक्त योगायोग आहे की आम्ही एकाच वेळी इथे आलो आणि तुमच्यासमोर हजर झालो.”

ऋषी कपूर यांच्याकडून असं ऐकल्यानंतर काही पत्रकार त्यांना विचारतात, “असं का?” त्याचं उत्तर देताना ऋषी कपूर पुढे बोलू लागतात, “असं यासाठी कारण..” मात्र तितक्यातच रणबीर त्यांना थांबवतो आणि म्हणतो, “काहीच समस्या नाहीये.” यापुढे तो वडिलांचं कौतुक करत म्हणतो, “यांच्यापेक्षा सुंदर व्यक्ती या जगात बनलीच नाही.” असं म्हणून तो तिथून निघून जातो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘प्रत्येक जण सलमान खान असू शकत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘पालकांसोबत राहणारा स्टार म्हणजे सलमानच’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘म्हणूनच रणबीरने चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे, कारण खऱ्या आयुष्यातही त्याने तेच पाहिलंय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.