‘महिला महिन्याला 1 पॅड नाहीतर…’, ‘ॲनिमल’ सिनेमातील डायलॉगवर महिलांकडून संताप व्यक्त

| Updated on: Dec 08, 2023 | 12:17 PM

Animal : 'पॅड चेंज करने में इतना नाटक...', अभिनेता रणबीर कपूर याच्या डायलॉगवर महिलांकडून संताप व्यक्त... सोशल मीडियावर वादग्रस्त वातावरण... सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमागिरी करत आहे, पण रणबीर कपूर याचे काही डायलॉग वादाच्या भोवऱ्यात...

महिला महिन्याला 1 पॅड नाहीतर..., ‘ॲनिमल’ सिनेमातील डायलॉगवर महिलांकडून संताप व्यक्त
Follow us on

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहेत. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे, तर दुसरीकडे सिनेमाला विरोध देखील होत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला दुजोरा देणारा सिनेमा असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, अभिनेता रणबीर कपूर याचे डायलॉग देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ज्यामुळे सिनेमा आणि अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावं लागत आहे.

सिनेमात रणबीर कपूर याचा एक डायलॉग आहे, ज्यामध्ये अभिनेता महिलांच्या मासिक पाळी विषयी बोलताना दिसत आहे. ‘पॅड चेंज करने में इतना नाटक क्यो करती है…’ या सीनवरुन सोशल मीडियावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे नेटकरी अभिनेता आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर निशाणा साधत आहेत.

हे सुद्धा वाचा

सिनेमात एका सीनमध्ये रणबीर पत्नी रश्मिका मंदाना हिच्यावर ओरडताना दिसत आहे. अभिनेता म्हणतो, प्रत्येक महिन्यात मासिक पाळीबद्दल तक्रार करत असतेस. शिवाय एका सीनमध्ये अभिनेता पत्नीला मारहाण देखील करतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगलेली आहे.

 

‘ॲनिमल’ सिनेमातील एक डायलॉगमध्ये अभिनेता म्हणतो, ‘महिन्याला चारवेळा पॅड बदलण्यासाठी इतकी नाटकं करतेस.. मला रोज 50 पॅड बदलावे लागत आहेत…’ सिनेमात रणबीर त्याच्या सर्जरीची तुलना महिलांच्या मासिक पाळीसोबत करत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रणबीर आणि दिग्दर्शकाला ट्रोल केलं आहे.

‘ॲनिमल’ सिनेमातील सीनवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘मला जाणून घ्यायचं आहे वांगा कोणत्या गांजाचा वापर करतो. महिलांना पॅड वयाच्या 11 व्या वर्षापासून वयाच्या 59 व्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याचे पाच दिवस बदलावे लागतात..’ दुसरा नेटकरी म्हणतो, ‘देवाला माहिती तुम्ही तुमच्या घरातील महिलांना कशी वागणूक देता…’, तिसरा नेटकरी म्हणतो, ‘ती पाच दिवसांत चार पॅड नाही तर, एका दिवसांत चार वेळा पॅड बदलते…’ अशा प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देत संताप व्यक्त करत आहेत.

सिनेमातील आणखी एका सीनबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर, रश्मिका हिला म्हणतो, ‘में तुम्हे जोर से थप्पड मारुंगा… पहला किस हुआ… पहला सेक्स हुआ… पहला थप्पड नहीं हुआ ना…’, अनेक गोष्टींमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.