मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रणबीर कपूर याला ईडीनं समन्स बजावलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याची लवकरच चौकशी होवू शकते… ऑनलाईन गेमिंग प्रकरणात अभिनेत्याला समन्स बजावण्यात आला आहे. महादेव गेमिंग ऍप जाहिरातीतील अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अभिनेता संबंधित ऍपचं प्रमोशन करत होता. प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्याला मोठी रक्कम, रोख स्वरूपात मिळाली होती असा दावा करण्यात आला आहे. महादेव ऍपचे संस्थापक असे 4 ते 5 ऍप्स चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ऍपचे कॉल सेंटर आहेत. श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये ऍपचे कॉल सेंटर आहेत. याप्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे नक्की सत्य बाहेर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संबंधित प्रकरणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. पण यावर अद्याप अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी ईडीने समन्स बजावला आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांना देखील ईडीने समन्स बजावण्यात आलं आहे.
रणबीर कपूर याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.
रणबीर कपूर फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेता चर्चेत आला. लग्नाआधी दोघांनी अनेक वर्ष डेट केलं त्यानंतर रणबीर आणि आलिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलिया यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.