आलिया भट्ट नाही तर चक्क ‘या’ खास व्यक्तीच्या नावाचा मानेवर काढला रणबीर कपूर याने टॅटू, दीपिका पादुकोणच्या..

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आता थेट रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट रिलीज होताय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय.

आलिया भट्ट नाही तर चक्क या खास व्यक्तीच्या नावाचा मानेवर काढला रणबीर कपूर याने टॅटू, दीपिका पादुकोणच्या..
| Updated on: Nov 24, 2023 | 6:46 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आगामी ॲनिमल चित्रपटामुळे चर्चेत आहे. ॲनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. ॲनिमल चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर दिसतोय. नुकताच आता ॲनिमल चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात पोहचलेल्या रणबीर कपूर याने मोठा खुलासा केल्याचे दिसतंय. रणबीर कपूर याने दीपिका पादुकोण हिच्या पाऊलावर पाऊल टाकते आणि मानेवर खास टॅटू तयार करून घेतलाय. तुम्हाला नक्कीच वाटले असेल की, रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिच्या नावाचा टॅटू आपल्या मानेवर तयार केला.

रणबीर कपूर याने आलिया भट्ट हिच्या नावाचा नाही तर आलियापेक्षाही खास असलेल्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू आपल्या मानेवर तयार करून घेतलाय. विशेष म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चक्क आपल्या मानेवरील टॅटू दाखवताना देखील रणबीर कपूर हा दिसत आहे. रणबीर कपूर याने मुलगी राहा कपूर हिच्या नावाचा टॅटू तयार करून घेतलाय आणि हाच टॅटू दाखवताना रणबीर कपूर दिसला.

आता रणबीर कपूर याचा हा टॅटूचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा टॅटूबद्दल बोलताना दिसला. त्यानंतर लगेचच शर्ट खाली करून मानेवरील टॅटू दाखवताना रणबीर कपूर हा स्पष्ट दिसतोय. रणबीर कपूर याच्या या टॅटूच्या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

काही वर्षांपूर्वीच दीपिका पादुकोण हिने देखील तिच्या मानेवर रणबीर कपूर याच्या नावाचा अत्यंत खास असा टॅटू काढला होता. मात्र, काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आणि थेट यांनी ब्रेकअप झाले. मात्र, ब्रेकअपनंतर देखील काही महिने दीपिका पादुकोण हिच्या मानेवर रणबीर कपूर याच्या नावाचा टॅटू होता.

आता दीपिका पादुकोण हिला फाॅलो करत रणबीर कपूर याने देखील मुलगी राहा हिच्या नावाचा टॅटू तयार करून घेतला आहे. ॲनिमल या चित्रपटाकडून रणबीर कपूर याला मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर याचे चित्रपट काही खास म्हणावा तसा धमाका करू शकत नाहीत. ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.