Video | रणबीर कपूर भडकला, व्हिडीओ व्हायरल झाल्याने अभिनेता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, वाचा नेमके काय घडले?
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रणबीर कपूर याचा चित्रपट धमाका करताना दिसला. रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा काही दिवसांपूर्वीच तू झुठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला होता. रणबीर कपूर याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले असून राहा हिच्या नावाचा अर्थ सांगणारी एक पोस्ट आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर शेअर केली. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही करीना कपूर हिच्या घरी गेली होती, विशेष म्हणजे यावेळी आलिया हिच्यासोबत राहा देखील होती. याचे अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल झाले.
रणबीर कपूर हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रणबीर कपूर हा रागात दिसत आहे. रणबीर कपूर याला गाडीमधून उतरताना पाहून फोटोग्राफर्स हे रणबीर कपूर याच्याकडे धावत गेले.
रणबीर कपूर पुढे निघाला. त्यावेळी काही रणबीर कपूर याच्या मागे काही फोटोग्राफर्स गेले आणि फोटोसाठी थांबण्याची विनंती केली. यावर फोटोग्राफर्सवर भडकताना रणबीर कपूर हा दिसला आहे. रणबीर कपूर हा फोटोग्राफर्सला म्हणतो की, ओरडायला काय झाले? यावर काही फोटोग्राफर्सवर हे रणबीर कपूर याला साॅरी म्हणताना देखील दिसत आहेत.
View this post on Instagram
आता हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रणबीर कपूर याचे फोटोग्राफर्ससोबतचे असे वागणे अनेकांना अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर अनेकांनी रणबीर कपूर याला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, हा फारच विचित्र आहे रणबीर कपूर.
दुसऱ्याने लिहिले की, या बाॅलिवूड स्टारच्या अशाच वागण्याने बाॅलिवूडची वाट लागलीये. तिसऱ्याने लिहिले की, यांचे चित्रपट चालत नसल्याने यांची फारच जास्त चिडचिड वाढली आहे. अजून एकाने लिहिले की, कधी हा चाहत्याचा मोबाईल फेकून देतो तर कधी फोटोग्राफर्सवर भडकतो, यामुळे हा मला अजिबातच आवडत नाही. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकांनी रणबीर कपूर याला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.