Ranbir Kapoor | ती रोज ‘हे’ काम करतेच, आलिया भट्ट हिच्याबद्दल रणबीर कपूर याचा मोठा खुलासा, थेट…
रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. रणबीर कपूर हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी करण जोहर याने रणबीरबद्दल मोठा खुलासा केला.
मुंबई : रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला थेट ईडीकडून समन्स पाठवण्यात आलाय. रणबीर कपूर याची चाैकशी ईडीकडून केली जाणार आहे. मुळात म्हणजे रणबीर कपूर याला 6 आॅक्टोबर रोजीच ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहायचे होते. मात्र, रणबीर कपूर याने ईडीला (ED) मेल करत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. महादेव अॅप प्रकरणात रणबीर कपूर याचे पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट आहे.
फक्त रणबीर कपूर हाच नाही तर इतरही बरेच कलाकार हे ईडीच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळाले. या प्रकरणात सर्वांचीच चाैकशी होणार असल्याचे देखील सांगितले जातंय. रणबीर कपूर याने या अॅपला प्रमोट करण्यासाठी तगडा पैसा घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इतरही काही कलाकारांचे या प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाले.
रणबीर कपूर याचा अॅनिमल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर दिसतोय. मात्र, या महादेव अॅप प्रकरणाचा फटका रणबीर कपूर याच्या या चित्रपटाला बसू शकतो, असे सांगितले जातंय. नुकताच आता रणबीर कपूर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना तो दिसलाय.
रणबीर कपूर यावेळी राहा आणि आलिया यांच्याबद्दल बोलताना दिसला. रणबीर कपूर म्हणाला की, राहा हिच्यासाठी आलिया दररोज एक काम करत आहे. आलिया ही राहा हिच्यासाठी दररोज एक ईमेल करत आहे. विशेष म्हणजे ती हे बऱ्याच दिवसांपासून करतंय. मी विचार केला मी देखील हे करायला हवे…आता पुढच्या महिन्यात राहा ही एक वर्षांची होणार आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी लग्न केले. 6 नोव्हेंबरला आलिया भट्ट हिने राहा हिला जन्म दिला. विशेष म्हणजे राहा हिच्या जन्मानंतर अगदी काही दिवसांमध्येच आलिया भट्ट ही आपल्या कामावर परतली. राहा हिच्या जन्मानंतर आलियाने थेट काश्मीर येथे राॅकी आैर रानी की प्रेम कहानी चित्रपटातील गाण्याच शूटिंग केले. आलिया भट्ट आणि राहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.