Animal | ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूरने किती स्वीकारली फी? बॉबी देओलचंही मानधन जाणून घ्या..

रणबीर कपूरच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे.

Animal | 'ॲनिमल'साठी रणबीर कपूरने किती स्वीकारली फी? बॉबी देओलचंही मानधन जाणून घ्या..
Animal MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 8:46 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाची नवीन जोडी आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या सुपरहिट चित्रपटाचा दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाने ‘ॲनिमल’चं दिग्दर्शन केलं आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. यामध्ये रणबीर आणि रश्मिकासोबतच अनिल कपूर, बॉबी देओल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी रणबीरने त्याच्या फीमध्ये 10 किंवा 20 नाही तर तब्बल 50 टक्क्यांनी घट केल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर एका चित्रपटासाठी जवळपास 70 कोटी रुपये मानधन स्वीकारतो. मात्र ‘ॲनिमल’साठी त्याने फक्त 30 ते 35 कोटी रुपये स्वीकारले आहेत. या गँगस्टर ड्रामा फिल्मचं प्रॉडक्शन मूल्य वाढवण्यासाठी त्याने स्वत:च्या मानधनात कपात केल्याचं समजतंय. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, तर कमाईतील काही नफ्याचा भाग रणबीरला मिळणार आहे. मात्र नफ्याचा हा भाग किती टक्के असेल, ते अद्याप स्पष्ट नाही.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

‘ॲनिमल’मधील इतर कलाकारांच्या मानधनाबद्दलचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये अनिल कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी दोन कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. तर मुख्य अभिनेत्री रश्मिकाने या चित्रपटासाठी चार कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. या टीझरमध्ये बॉबी देओलच्या भूमिकेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने खलनायकी भूमिका साकारली असून त्यासाठी चार ते सहा कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

ॲनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी सनी देओलचा ‘गदर 2’ आणि अक्षय कुमार-पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर टाळण्यासाठी अखेर ॲनिमलच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.