फक्त अभिनेतेच नाही, बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री नशेच्या आहारी; गमवावलं सर्वकाही

व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींना सर्वकाही गमवावं लागलं... यामध्ये अभिनेतेच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रींचा देखील समावेश... 'या' अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण

फक्त अभिनेतेच नाही, बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्री नशेच्या आहारी; गमवावलं सर्वकाही
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 2:03 PM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | सेलिब्रिटींची रॉयल लाईफस्टाईल, अनेक महागड्या वस्तू, महागड्या गाड्या, प्रसिद्धी, लोकप्रियता… अनेक गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. एवढंच नाही तर, झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. अशात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. काही चांगल्या असतात, काही गोष्टींमुळे मात्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सेलिब्रिटींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. ज्यामुळे सेलिब्रिटी व्यसनाच्या आहारी जातात. बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेतेच नाही तर काही अभिनेत्री देखील नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांना सर्वकाही गमवावं लागलं… आज अशाच बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल जाणून घेवू…

अभिनेता फरदीन खान | फरदीन सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यानंतर फरदीन कोकीनच्या आहारी गेला. या वाईट सवयीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी २००१ मध्ये अभिनेत्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं.

अभिनेता संजय दत्त | संजूबाबा त्याच्या सिनेमांमुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिनेता दारु, कोकीन, हिरोइन यांसारख्या नशेच्या आहारी गेला होता. मायदेशी परत येण्यापूर्वी अभिनेत्याला परदेशातील पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर संजूबाबाने स्वतःला सावरलं.

अभिनेत्री कंगना रनौत | कंगना कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री दारु आणि ड्रग्सच्या जाळ्यात अडकली होती. एवढंच नाही तर, करियरच्या सुरुवातील अभिनेत्रीने अनेक धक्कादायक प्रसंगांचा सामना केला आहे. आता कंगना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेता रणबीर कपूर | रणबीर आता पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूर यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. एकदा अभिनेत्याने ड्रग्स घेत असल्याचं कबूल केलं होतं. वयाच्या १५ व्या वर्षी अभिनेता निकोटीनच्या आहारी गेला होता. पण त्यातून अभिनेत्या स्वतःची सुटका करुन घेतली.

अभिनेत्री मनिषा कोईराला | मनिषा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री व्यसनाच्या आहारी गेली होती. एवढंच नाही तर, व्यसन आणि रिलेशनशिपमुळे अभिनेत्रीने सर्वकाही गमावलं… आज मनिषा पैसा, संपत्ती सर्वकाही असून एकटी आयुष्य जगत आहे.

गायक हनी सिंग | प्रसिद्ध बॉलिवूड गायक हनी सिंग याला ड्रग्स आणि दारूची वाईट सवय लागली होती. ज्याचा परिणाम गायकाच्या करियरवर झाला. अनेक महिने गायक व्यसन मुक्ती केंद्रात होता. तेव्हा हनी सिंग वाईट सवयीतून स्वतःची सुटका करु शकला… आता हनी सिंग त्याच्या गाण्यांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो…

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.