Animal : ‘या’ 5 कारणांमुळे ‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय दमदार कमाई

Animal : पहिल्याच दिवशी ‘ॲनिमल’ सिनेमाने जगभरात केली 110 ते 115 कोटी रुपयांची कमाई, चित्रपटगृहात जात असाल तर, जाणून घ्या 5 करणं, ज्यामुळे सिनेमा हीट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’सिनेमाची चर्चा...

Animal : 'या' 5 कारणांमुळे ‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर करतोय दमदार कमाई
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 2:10 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. पण आता सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी देशात तब्बल 61 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर ‘ॲनिमल’ सिनेमाने जगभरात 110 ते 115 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सिनेमा बॉक्स ऑफिस का तुफान कमाई करत आहे यामागे 5 महत्त्वाची कारणं आहे. ज्यामुळे सिनेमा पाहाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहाकडे वळत आहे.

सांगायचं झालं तर, ‘जवान’ आणि ‘पठाण’ सिनेमानंतर ‘ॲनिमल’ सिनेमाचा बोलबाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. सिनेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रणबीर कपूर याला पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. सिनेमात रणबीर ग्रे शेड्सवर आधारित भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचा भयानक लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल.

‘ॲनिमल’ सिनेमाचं जितकं कौतुक होत आहे, तितकंच अभिनेता बॉबी देओल याचं देखील होत आहे. बॉबी याचा सिनेमातील खास अंदाज चाहत्यांनी कधीच पाहिला नसेल. सिनेमात बॉबी विरोधी भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

‘ॲनिमल’ सिनेमातील तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना. ‘ॲनिमल’ सिनेमातून रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आले. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं आहे. सिनेमातील दोघांची लव्हस्टोरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सिनेमातील अनेक सीन देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिग्दर्शत संदीप रेड्डी वांगा यांच्याकडे सिनेमा हीट ठरण्यासाठी खास ट्रीक्स आहेत. ‘ॲनिमल’ सिनेमा एक कैटुंबीक ड्रामा आहे. सिनेमात वडील आणि मुलाच्या नात्यावर अधारित अनेक गोष्टींनी अधोरेखीत करण्यात आलं आहे. सिनेमात अभिनेते अनिल कपूर यांनी रणबीर याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमीचं चाहत्यांसोबत सेलिब्रिटी देखील कौतुक करत आहेत. पण ‘ॲनिमल’ सिनेमासोबतच अभिनेता विकी कौशल स्टारर ‘सॅम बहादूर’ सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ या दोन सिनेमांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. अशात शर्यतीत कोणता सिनेमा बाजी मारणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....