Animal कधी होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित? ‘या’ ठिकाणी सिनेमा पाहाता येणार मोफत
Animal : चित्रपटगृहात नाही तर, घरबसल्या पाहा ‘ॲनिमल’ सिनेमा, ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच होणार प्रदर्शित? तर 'या' ठिकाणी सिनेमा पाहाता येणार मोफत... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा...
मुंबई | 6 डिसेंबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने पहिल्यांच दिवशी तुफान कमाई केली. आता देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. सिनेमात रणबीर आणि रश्मिका यांच्यासोबत अभिनेते अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, शक्त कपूर यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘ॲनिमल’ हा मल्टीस्टारर सिनेमा पाहाण्यासाठी चाहते चित्रपगृहात मोठी गर्दी करत आहेत. सिनेमाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळात आहे…
‘ॲनिमल’ सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपगृहात मोठी गर्दी केली. पण अद्यापही अनेकांनी सिनेमा पाहिलेला नाही. अशात ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही आणि ज्यांना सिनेमा पाहायचा आहे. त्यांना आता घरबसल्या ‘ॲनिमल’ सिनेमा पाहाता येणार आहे.
सांगायचं झालं तर नवीन सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांमध्ये सिनेमा ओटीची प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. पण रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण अद्याप कधी प्रदर्शित होणार याची तारीख समोर आलेली नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांनंतर ऑनलाईन लिक झाला आहे. सिमेमा टोरेंट वेबसाईट्स, तमिलरॉकर्स, टेलीग्राम आणि मूव्हीरुलज या ठिकाणी मोफत पाहाता येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ॲनिमल’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘ॲनिमल’ सिनेमाची कमाई
‘ॲनिमल’ सिनेमा यंदाच्या वर्षातील हीट सिनेमांपैकी एक सिनेमा ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने भारतात आतापर्यंत 241.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 39.9 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सिनेमातील काही सीन आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना सिनेमातील काही डायलॉग मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.