Ranbir Kapoor | चाहता घेत होता सेल्फी; चिडलेल्या रणबीर कपूरने थेट फेकून दिला फोन, पहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा रणबीरसोबत सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. याचवेळी रणबीर चिडतो आणि त्याचा फोन फेकतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

Ranbir Kapoor | चाहता घेत होता सेल्फी; चिडलेल्या रणबीर कपूरने थेट फेकून दिला फोन, पहा व्हिडीओ
Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 4:26 PM

मुंबई: आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत एक फोटो किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेता रणबीर कपूरचा एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रचंड उत्सुक होता. मात्र सेल्फी काढताना चिडलेल्या रणबीरने अचानक त्याचा फोन घेतला आणि तो मागे फेकून दिला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा रणबीरसोबत सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. याचवेळी रणबीर चिडतो आणि त्याचा फोन फेकतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

सुरुवातीला रणबीर त्या चाहत्यासोबत हसत सेल्फी काढत असतो. मात्र पुन्हा त्याने फोटो क्लिक करायला सुरुवात केल्यावर रणबीर त्याच्याकडे फोन मागतो आणि तो फेकून देतो. हे पाहून त्याच्या मागे उभे असलेले चाहते सुद्धा थक्क होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओमागचं सत्य अद्याप स्पष्ट झालं नाही. हा एका जाहिरातीचा व्हिडीओ असल्याचा अंदाजही काहींनी वर्तवला आहे. तर अनेकांनी रणबीरला त्याच्या वागणुकीबद्दल ट्रोल केलं आहे. ‘रणबीरला बॉयकॉट करा’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘रणबीर मला नेहमीच चांगला सुपरस्टार वाटायचा. मी त्याला कधीच असं वागताना पाहिलं नव्हतं. त्याला नेमकं काय झालंय? कदाचित कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे असं घडलं असावं’, असंही दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘आणखी द्या बॉलिवूडला पाठिंबा’, अशी उपरोधिक कमेंटही एकाने केली आहे.

पहा व्हिडीओ

रणबीर कपूरच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याचसोबत त्याचा ‘ॲनिमल’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रश्मिका मंदाना त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.