Ranbir Kapoor : ‘याला झालंय तरी काय?’, रणबीर कपूर याचा सुजलेला चेहरा पाहून चाहते हैराण
Ranbir Kapoor : रणबीर कपूर याचा व्हायरल होत असलेला फोटो पाहून चाहते हैराण... अभिनेत्याचा सुजलेला चेहरा पाहून चाहत्यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याची चर्चा... अभिनेत्याचा व्हायरल फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल...
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘एनिमल’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची चर्चा सुरु असताना अभिनेता भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड कप सेमी फायनल पाहण्यासाठी पोहोचला. वर्ल्ड कप सेमी फायनल दरम्यान रणबीर कपूर याने क्रिकेटर विराट कोहली याच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वत्र रणबीर कपूर याची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याचा चेहरा सुजलेला दिसत आहे.
रणबीर याचा सुजलेला चेहरा पाहिल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर, चाहत्यांनी अभिनेत्याला अनेक प्रश्न देखील विचारली आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेत्याचा चेहरा सुजलेला दिसत आहे.
रणबीर याचा फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मला असं वाटत आहे की, रणबीर याला पुन्हा व्यसन लागलं आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रणबीर कपूर याचं म्हातारपण येत आहे..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा माणूस आता वृद्ध होत आहे. त्याचा चेहरा तर पाहा… खूप वाईट वाटत आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर याच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
‘या’ कारणामुळे रणबीर कपूर याने सोडली होतं व्यसन
एका मुलाखतीत रणबीर कपूर याने मोठा खुलासा केला होता. अभिनेत्याने नॉनव्हेज आणि दारु पूर्णपणे सोडल्याचा खुलासा केला होता. मुलीसाठी स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवण्याचं वक्तव्य देखील अभिनेत्याने केलं होतं.
रणबीर कपूर याचा आगामी सिनेमा
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याची चर्चा आहे. ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून रणबीर याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील दोघांना एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक आहे. सिनेमातील गाणी देखील चाहत्यांना आवडत आहेत. एवढंच नाही तर, अभिनेता सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.
रणबीर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. रणबीर कायम पत्नी आलिया आणि लेक राहा कपूर यांच्याबद्दल बोलताना दिसतो. आलिया आणि रणबीर यांना एक मुलगी आहे. पण त्यांनी अद्याप लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. लेकीसाठी दोघांना इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा देखील रंगली आहे.