ऐश्वर्या राय हिच्यासोबत ‘हा’ सीन करताना थरथर कापताना दिसला रणबीर कपूर, अभिनेता म्हणाला, हिच चांगली संधी हात मारण्याची ठरवले आणि मग
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असतो. रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे लोकांच्या चांगला प्रतिसाद हा रणबीर कपूर याच्या चित्रपटाला मिळाला. रणबीर कपूर हा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करत होता. नुकताच रणबीर कपूर याने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे तो चर्चेत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा तू झुठ्ठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे रणबीर कपूर याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त असा प्रतिसाद दिला. रणबीर कपूर हा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. आलिया भट्ट हिचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा करण्यात आलाय. आलिया भट्ट हिने रणबीर कपूर याच्यासोबतचे काही खास फोटो (Photo) देखील शेअर केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी 14 एप्रिलला लग्न केले. रणबीर कपूर आणि आलिया हे दोघे एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत होते.
नुकताच रणबीर कपूर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याने मोठा खुलासा केलाय. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय हे ए दिल है मुश्किल या चित्रपटात दिसले होते. विशेष म्हणजे यांच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केली. मात्र, या चित्रपटातील एका सीन वेळी रणबीर कपूर याचे हात थरथर कापत होते.
रणबीर कपूर हा म्हणाला की, ए दिल है मुश्किल या चित्रपटात ऐश्वर्या राय हिच्यासोबत माझा एक सीन होता. या सीनमध्ये मला ऐश्वर्या राय हिच्या गालावर हात लावायचा होता. मात्र, ते मी करू शकत नव्हतो. ज्यावेळी मी ऐश्वर्या राय हिच्या गालाजवळ माझा हात घेऊन जात होतो, त्यावेळी माझा हात थरथर कापत होता.
हा रोमांटिक सीन करताना मला लाज देखील खूप वाटत होती. पुढे रणबीर कपूर म्हणाला की, मला ऐश्वर्या राय हिने समजावले की, हा फक्त एक सीन आहे चित्रपटातील त्यानंतर मला वाटले की, हिच चांगली संधी आहे हात मारण्याची आणि मी ते केले. म्हणजेच काय तर रणबीर कपूर हा ऐश्वर्या राय हिच्यासोबत रोमांटिक सीन करण्यासाठी घाबरत होता.
या मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याने हिच संधी आहे हात मारण्याची म्हटल्याने आता सर्वांना मोठा धक्का बसलाय. काही लोक हे रणबीर कपूर याच्यावर टिका करताना देखील दिसत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 6 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. राहा हिची एकही झलक चाहत्यांना अजून दाखवण्यात आली नाही.