Ranbir Kapoor | रणबीर कपूर याचे मोठे विधान, रामायण चित्रपटाबद्दल अपडेट

| Updated on: Oct 26, 2023 | 4:45 PM

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रणबीर कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याचे मोठे विधान, रामायण चित्रपटाबद्दल अपडेट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा तू झुठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला. मात्र, या चित्रपटाला फार काही धमाका करण्यात यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप गेला.

तू झुठी मैं मक्कार या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात चित्रपट फ्लाॅप गेला. रणबीर कपूर याच्या तू झुठी मैं मक्कार चित्रपटात श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत दिसली. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूर याने नुकताच अत्यंत मोठा खुलासा हा केलाय.

रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर मोठे खुलासे करताना दिसतोय. रणबीर कपूर याने मोठी घोषणा करत म्हटले की, पुढील सहा महिने मी ब्रेक घेणार आहे. पुढील सहा महिने मी माझी मुलगी राहा हिला फक्त वेळ देणार. यावेळी राहा हिच्याबद्दल सांगताना रणबीर कपूर दिसला.

नुकताच आता रणबीर कपूर याने रामायण या चित्रपटाबद्दल मोठे अपडेट दिलंय. रणबीर कपूर हा म्हणाला की, या चित्रपटात मला काम करायला मिळत असल्याने मी स्वत: ला जास्त भाग्यवान समजतो. हा विषय खूप जास्त मोठा आहे. जर सर्वकाही व्यवस्थित राहिले तर माझा पुढचा रामायण हाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

रणबीर म्हणाला, मी या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी खूप जास्त उत्साही आहे. संपूर्ण देश आणि जगासाठी ही स्टोरी महत्वाची आहे. याला योग्यप्रकारे मांडणे फार जास्त आवश्यक आहे. आता हे स्पष्ट आहे की, रामायण चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय.