Randeep Hooda अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या राय बद्दल का म्हणाला, ‘ती खूप चांगली आहे आणि…’
Randeep Hooda | ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमामुळे चर्चेच असलेला रणदीप हुड्डा याने अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या राय आणि तिच्या कुटुंबाबद्दल असं वक्तव्य का केलं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा... नक्की काय आहे प्रकरण?
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा गेल्या काही दिवसांपासून ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेता सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. एवढंच नाहीतर, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमात वीर सावरकर यांची भूमिका साकारल्यामुळे सर्वच स्तरातून अभिनेत्याचं कौतुक होत आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं कौतुक केलं आहे. सांगायचं झालं तर, ‘सरबजीत’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात ऐश्वर्याने रणदीप याच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणदीप याने ऐश्वर्या हिच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे. ऐश्वर्या हिच्याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘ती खूप चांगली आहे… नम्र आहे… तिनं तिचं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. स्वतःची भूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा ऐश्वर्याने पूर्ण प्रयत्न केला. सेटवर आमची भेट फार कमी झाली कारण सीन वेगळे शूट करण्यात आले होते. पण जेव्हा आम्ही भेटलो आहोत, तेव्हा ऐश्वर्यासोबत गप्पा व्हायच्या…’ असं अभिनेता म्हणाला.
रणदीप यांचं सरबजीत यांच्या कुटुंबासोबत नातं…
सरबजीत यांच्या कुटुंबासोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा सिनेमाची शुटिंग सुरु होती, तेव्हा ऐश्वर्या हिच्यापेक्षा जास्त सरबजीत यांच्या बहिणीसोबत माझं नातं अधिक घट्ट झालं. त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या इच्छा होती, माझ्याकडून त्यांचं अंतिमसंस्कार व्हायला हवेत आणि मी तसं केलं. आता असं वाटतं त्यांच्यासोबत आणखी वेळ व्यतीत करता आला असता तर… त्या उत्तम महिला होत्या. सरबजीत यांच्या मुलांचा त्यांनी योग्य सांभाळ केलं. मुलं आता मोठी झाली आहेत. वेल सेटल्ड आहेत. मी त्यांच्या संपर्कात आजही आहे. त्या सिनेमामुळे माझ्या खऱ्या आयुष्यावर फार फरक पडला आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
रणदीप याचा आगामी सिनेमा
भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने सिनेमात वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार असं म्हणायला हरकत नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.