‘थर्ड क्लास आदमी…’, जेव्हा रणधीर कपूर यांनी जावयासाठी वापरले वाईट शब्द

Kapoor Family | रागाच्या भरात रणधीर कपूर लेकीच्या नवऱ्याला म्हणाले, 'थर्ड क्लास आदमी', आजही विसरु शकले नाहीत 'ती' घटना... सध्या सर्वत्र करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... दोघींनी अनेकदा केलाय धक्कादायक गोष्टींचा सामना...

'थर्ड क्लास आदमी...', जेव्हा रणधीर कपूर यांनी जावयासाठी वापरले वाईट शब्द
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 12:25 PM

मुंबई | 11 मार्च 2024 : बॉलिवूडमधील कपूर कुटुंब हे इंडस्ट्रीमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. आता कपूर कुटुंबातील अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. सांगायचं झालं तर कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण एक काळ असा होता जेव्हा कपूर कुटुंब अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होतं.

गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. पण करिश्माने घटस्फोटनंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा हिचं लग्न उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं होतं. पण दोन मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाहीत. घटस्फोटादरम्यान, करिश्मा – संजय यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.

फक्त करिश्मानेच संयज याच्यावर आरोप केले नाहीतर, वडील रणधीर कपूर यांनी देखील मोठ्या जावयासाठी वाईट शब्द वापरले होते. एका मुलाखतीत रणधीर कपूर म्हणाले होते, ‘कपूर कुटुंबाला सर्वत्र मान आहे. आम्हाला कोणाच्या संपत्तीची गरज नाही. आम्ही आमच्या कौशल्याच्या जोरावर गडगंज पैसा कमावला आहे… संजय कपूर हा थर्ड क्लास माणूस आहे…’ असं रणधीर कपूर म्हणाले होते…

फक्त रणधीर कपूर यांनीच नाहीतर, करीनाने देखील बहिणीच्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, ‘करिश्माच्या आयुष्यातील हा कठीण काळ प्रचंड कठीण आहे. करिश्माच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होत आहे. पण तिच्या आयुष्याबद्दल मी सर्वांसमोर कधीच बोलत नाही. मी माझ्या बहिणीसाठी प्रॉटेक्टिव्ह आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती…

करिश्मा कपूर – करीना कपूर

करिश्मा – करीना अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. एवढंच नाहीतर, सोशल मीडियावर एकमेकींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दोघी एकमेकींवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

करिश्मा कपूर हिच्या घटस्फोटाला आता 10 वर्ष झाली आहेत. पण अभिनेत्रीने कधीच दुसरं लग्न करण्याचा विचार केला नाही. अभिनेत्रीने दोन मुलांसाठी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही… असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. करिश्मा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.