‘वदनी कवळ’ म्हणतानाच्या व्हिडीओमुळे अभिनेत्रीवर भडकले नेटकरी; म्हणाले ‘एवढं किंचाळण्यापेक्षा..’

'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपाची भूमिका साकारलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. रेश्मा नुकतीच अनघा अतुलच्या नव्या 'वदनी कवळ' या पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळी त्यांनी हा व्हिडीओ शूट केला. मात्र त्यावरून नेटकरी नाराज झाले आहेत.

'वदनी कवळ' म्हणतानाच्या व्हिडीओमुळे अभिनेत्रीवर भडकले नेटकरी; म्हणाले 'एवढं किंचाळण्यापेक्षा..'
Reshma ShindeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 1:33 PM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. रेश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. याच व्हिडीओमुळे तिला ट्रोल केलं जातंय. रेश्माने तिच्या या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका रेस्टॉरंटची झलक दाखवली आहे. या रेस्टॉरंटचं नाव ‘वदनी कवळ’ असं आहे. याच रेस्टॉरंटमध्ये रेश्मा इतरांसह मिळून जेवणाआधी म्हटली जाणारी ‘वदनी कवळ’ ही प्रार्थना म्हणताना दिसतेय. मात्र ज्या अंदाजात त्यांनी ही प्रार्थना म्हटली आहे, ते पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी रेश्मावर टीका केली आहे.

घराच्या जेवणाची आठवण करून देणारं ‘वदनी कवळ’ हे रेस्टॉरंट पुणेकरांसाठी सज्ज झाल्याचं, रेश्माने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. ‘सुग्रस आणि सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या. मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय, तुम्हीसुद्धा घ्या. तुम्ही निराश होणार नाही याची मला खात्री आहे’, असंही तिने लिहिलं आहे. त्याचप्रमाणे ‘मला पूर्ण वदनी कवळ येतं. एखादा शब्द चुकू नये म्हणून हा प्रयत्न,’ असंही तिने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये रेश्मासह इतरही जण मोठमोठ्याने ओरडत ‘वदनी कवळ’ म्हणताना दिसत आहेत. याच गोष्टीमुळे नेटकरी नाराज आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘आदराने म्हटलं पाहिजे. मस्करी वाटते. निदान सेलिब्रिटींनी तरी पाळावं ही अपेक्षा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘किती किंचाळतायत’, अशी तक्रार दुसऱ्या युजरने केली. ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे ना, मग इतकं किंचाळत का प्रार्थना करताय? जरा आदर ठेवा त्या पूर्णब्रह्माबद्दल. इतकी ओव्हरॲक्टिंग करू नका’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘एवढं किंचाळण्यापेक्षा न म्हटलेलं बरं’, अशी कमेंट युजर्सनी केली आहे.

रेश्माने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत या मालिकेत आशुतोष गोखलेनंसुद्धा मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय हर्षदा खानविलकर, विदिशा म्हस्कर, अनघा भगरे यांच्याही भूमिका होत्या. अनघा हिनेच पुण्यात ‘वदनी कवळ’ हे रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.