Rani Mukerji: ‘…तेव्हा एकटीच संघर्ष करत होती’, ‘ती’ परिस्थिती ओढवल्यानंतर घाबरली राणी मुखर्जी

प्रसिद्धी आणि ओळख असली तर एखाद्या गोष्टीची भीती प्रत्येकाला वाटते; राणी मुखर्जी देखील 'त्या' क्षणी घाबरली... अखेर अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील भीती

Rani Mukerji: '...तेव्हा एकटीच संघर्ष करत होती', 'ती' परिस्थिती ओढवल्यानंतर घाबरली राणी मुखर्जी
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:20 AM

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सध्या राणी ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सत्य घटनेवर अधारित सिनेमा असल्यामुळे विश्लेषकांकडून सिनेमाचं कौतुक होत आहे. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा समाधन कारक कामगिरी करताना दिसत आहे. ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राणीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. मुलाखतीत राणीने अशी एक गोष्ट सांगितली, जिची अभिनेत्रीला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी भीती वाटत होती. सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी नुकताच झालेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

राणी मुखर्जी म्हणते, ‘सिनेमा चांगला असेल तर कथेला प्रेक्षक नक्की भेटतील यावर माझा विश्वास आहे. मग तो सिनेमा कोणत्याही जेनरचा असो… आमच्या सिनेमापुढे अनेक अव्हाने होती. कारण एक नवीन शब्द सध्या तुफान चर्चेत आहे आणि तो म्हणजे ओटीटी कटेंट… या गोष्टीची मला प्रचंड भीती वाटत होती. मला असं सिनेमाचा अनुभव चित्रपटगृहात जावूनच घेतला जावू शकतो…’

पुढे राणी म्हणाली, ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी टीकाचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येत लोक सिनेमाला ओटीटी कटेंट असल्याचे सांगत होते. ही गोष्ट खरंच भीतीदायक होती. कारण विरोधकांमध्ये जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त प्रार्थना करु शकता… मी देखील फक्त प्रार्थना करत होती. अखेर आम्ही प्रेक्षकांना दाखवून दिलं…’

हे सुद्धा वाचा

‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा सागरिका चक्रवर्ती यांच्यावर आधारित आहे. नॉर्वे प्रशासनाच्या नियंत्रणातून आपल्या मुलांना मुक्त करण्यासाठी ती एकटीच संघर्ष करते. राणी मुखर्जी हिने मुलांसाठी झटणाऱ्या आईची कथा मोठ्या पडद्यावर मांडली आहे. सिनेमात राणी शिवाय नीना गुप्ता, अनिर्बन भट्टाचार्य आणि जिम सरभ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

राणी मुखर्जी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा असायची. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने काम केलं आहे.

राणीच्या नवीन सिनेमांची चक्चा आता तर रंगलेलीच असते, पण अभिनेत्री तिच्या जुन्या सिनेमांमुळे देखील ओळखली जाते. आता राणी तिच्या ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती रुपयांपर्यंत मजल मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.