राणी मुखर्जीची लेक अखेर समोर, आदिराचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Rani Mukerji | राणी मुर्खर्जी कधीच लेकीला आणत नाही जगा समोर, अखेर आदिराचा क्यूट व्हिडीओ आला समोर, सर्वत्र राणीच्या लेकीची चर्चा... अनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये दिसली राणीची लेक...
मुंबई | 5 मार्च 2024 : देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंबानी यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित राहातात. आता सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये उपस्थित राहिलेल्या सेलिब्रीटींचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी देखील उपस्थित होती. राणीसोबत तिची लेक आदिरा देखील आली होती. सध्या सोशल मीडियावर आदिराचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राणी मुखर्जीची लेक गुलाबी रंगाच्या पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत.
व्हिडीओमध्ये राणी लेकीची ओळख सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत करुन देताना दिसत आहे. आदिरा हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. व्हिडीओ दूरून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे आदिराचा चेहरा पूर्ण दिसत नाही. पण आदिराला पाहिल्यानंतर चाहते देखील आनंदी झाले आहेत.
Glimpse of #Thalaivar family met Bollywood actress #RaniMukerji family at #AnantRadhikaPreWedding
❤️❤️❤️❤️❤️#Rajinikanth | #Rajinikanth𓃵 | #SuperstarRajinikanth | #superstar @rajinikanth | #AnantAmbani | #anantambaniwedding | #AnantRadhikaCelebration pic.twitter.com/DP3tSidl87
— Suresh balaji (@surbalutwt) March 3, 2024
सांगायचं झालं तर, राणी मुखर्जी लेक आदिरा हिला कॅमेरा आणि सोशल मीडियापासून दूर ठेवते. त्यामुळे आदिराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. म्हणून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आदिरा दिसताच चर्चांना उधाण आलं आहे.
आदिरा हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदिरा हिची चर्चा रंगली आहे. राणी मुखर्जी कायम कोणत्याही मुलाखतीत लेकीबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. पण अभिनेत्रीने कधीच लेकीचा चेहरा चाहत्यांनी दाखवलेला नाही.
राणी मुखर्जी आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. एकेकाळी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य करणारी राणी फार कमी सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन
प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक स्टारकिड्स देखील उपस्थीत होते. राहा कपूर, जेब अली खान, तैमूर अली खान, आराध्या बच्चन देखील कुटुंबासोबत आले होते. सोशल मीडियावर स्टारकिड्स देखील व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.