कंगाल झालेल्या राणी मुखर्जी हिच्या सासऱ्यांना ‘या’ अभिनेत्रीमुळे झाला फायदा; पण तिचं झालं हृदयद्रावक निधन

Bollywood : पूर्णपणे कंगाल झालेले राणी मुखर्जी हिचे सासरे 'या' अभिनेत्रीमुळे झाले मालामाल, अभिनेत्रीत्या चाहत्यांची संख्या होती फार मोठी, तिच्या निधनामुळे सर्वांना बसला मोठा धक्का... सध्या सर्वत्र राणी मुखर्जी हिचे सासरे आणि त्यांच्या आयुष्याती खास अभिनेत्रीची चर्चा... कोण होती 'ती'?

कंगाल झालेल्या राणी मुखर्जी हिच्या सासऱ्यांना 'या' अभिनेत्रीमुळे झाला फायदा; पण तिचं झालं हृदयद्रावक निधन
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 12:04 PM

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : आयुष्यात प्रत्येकाला यश – अपयशाचा सामना करावा लागतो. पण सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी यश – अपयशाचा सामना केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करताना निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये एका सिनेमासाठी लावले. पण त्यांच्या नशिबी फक्त अपयश येत राहिलं. असंच काही अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे सासर आणि निर्माते यश चोप्रा यांच्यासोबत झालं होतं. यश चोप्रा यांनी अनेक सिनेमे बॉलिवूड दिले आहेत. आजही यश चोप्रा यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. पण एक काळ असा होता जेव्हा यश चोप्रा पूर्णपणे कंगाल झाले होते.

रिपोर्टनुसार, यश चोप्रा यामे एका पाठोपाठ चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. यश चोप्रा यांचे बँक खाते देखील पूर्णपणे रिकामे झाले होते. एवढंच नाही तर यश चोप्रा यांच्या स्टुडिओला टाळे देखील लागणार होते. पण यश चोप्रा यांच्या वाईट काळात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्यांना साथ दिली आणि यश चोप्रा मालामाल झाले.

यश चोप्रा यांच्या आयुष्यात आलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्रीदेवी होत्या. एका मुलाखतीत यश चोप्रा म्हणाले होते, ‘मझे एका पाठोपाठ चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. माझं नशीब मला साथ देत नव्हतं. माझ्याकडे बिलकूल पैसे नव्हते. माझ्या प्रॉडक्शन हाऊसला टाळे लागणार होते.’ असं यश चोप्रा म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, यश चोप्रा यांनी ‘चांदनी’ सिनेमा निर्मित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात श्रीदेवी आहेत, म्हणजे सिनेमा हीट होणार असा विश्वास यश चोप्रा यांना होता आणि तेव्हा यश चोप्रा यांचा विश्वास खरा देखील ठरला. ‘चांदनी’ सिनेमा फक्त 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आणि सिनेमाने तेव्हा 27 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

‘चांदनी’ सिनेमा हिट ठरल्यानंतर यश चोप्रा यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. यश चोप्रा यांच्यासाठी श्रीदेवी लकी ठरल्या. तेव्हा बॉलिवूडमध्ये श्रीदेवी यांचं राज्य होतं. ‘चांदनी’ सिनेमानंतर यश चोप्रा यांनी अनेक हीट सिनेमांसाठी काम केलं. आजही यश चोप्रा यांचे सिनेमे चाहते मोठ्या आवडीने पाहातात.

श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2018 मध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला. दुबई याठिका एका हॉटेलच्या रुममधील बाथटबमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज श्रीदेवी जगात नसल्या तरी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आजही चर्चेत असतात.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.