आठ वर्षांपासून मुलीचा चेहरा माध्यमांसमोर का दाखवला नाही? अखेर राणी मुखर्जीने सांगितलं कारण

राणीने 9 डिसेंबर 2015 रोजी आदिराला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर राणीने काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये राणीने एका आईचीच भूमिका साकारली आहे.

आठ वर्षांपासून मुलीचा चेहरा माध्यमांसमोर का दाखवला नाही? अखेर राणी मुखर्जीने सांगितलं कारण
Rani Mukerji with daughterImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 12:33 PM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी जेव्हा चिमुकल्या पाहुणा किंवा पाहुणीचं आगमन होतं, तेव्हा त्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अद्याप त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवला नाही किंवा सोशल मीडियावर फोटो अपलोड केले नाहीत. यात अभिनेत्री राणी मुखर्जीचाही समावेश आहे. राणीने निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न केलं. या दोघांना आदिरा ही मुलगी आहे. मात्र आजवर राणीने आदिराला माध्यमांसमोर आणलं नाही. यामागचं कारण खुद्द राणीनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

मुलीचा चेहरा का नाही दाखवला?

“यात कोणतीच सुपर पॉवर नाही. मी फक्त प्रेमाने फोटोग्राफर्सना सांगते की माझ्या मुलीचे फोटो क्लिक करू नका आणि ते माझं ऐकतात. पापाराझींना एकदा सांगितलं की ती गोष्ट ते नीट लक्षात ठेवतात. आदित्य चोप्राला त्याचं खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडतं, हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ते माझ्या मुलीचे फोटो क्लिक करत नाहीत. मला स्वत:लाही माझं खासगी आयुष्य लाइमलाइटमध्ये आणायला आवडत नाही”, असं राणी म्हणाली.

प्रत्येक सेलिब्रिटी आईसाठी खास संदेश

आपल्या मुलीला सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं तिने पुढे स्पष्ट केलं. “आदिराने इतरांप्रमाणेच सर्वसामान्य मुलींसोबत शाळेत जावं, त्यांच्यासोबत खेळावं अशी माझी इच्छा आहे. माझ्यासाठी या लहानसहान गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजकाल स्टारकिड्स बऱ्याचदा प्रकाशझोतात येतात. मात्र आपण सेलिब्रिटीच्या घरात जन्माला आल्यामुळे आपण खास आहोत हे आदिराला वाटू नये, याची मी काळजी घेते. ती तिच्या आयुष्यात पुढे जाऊन जे करेल, त्याच्या आधारे तिला खास व्यक्ती बनावं लागेल”, असं राणी पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा

मुलीचा प्रीमॅच्युअर जन्म

राणीने 9 डिसेंबर 2015 रोजी आदिराला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर राणीने काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. मातृत्वाविषयी बोलताना राणी म्हणाली, “माझ्या मुलीचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेच्या दोन महिन्यांआधी झाला होता. एक आई म्हणून मला तिची प्रचंड काळजी वाटत होती. जवळपास सात दिवस ती NICU मध्ये दाखल होती. आई झाल्यानंतर तुमच्यातली एक महत्त्वाची गोष्ट क्षणार्धात बदलते. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या बाळाचा चेहरा पाहता, त्या क्षणापासून तुम्हाला या जगात दुसरं काहीच अधिक महत्त्वाचं वाटत नाही. स्वत:पेक्षाही जास्त महत्त्वाचं काहीतरी तुमच्याकडे आलेलं असतं.”

राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये राणीने एका आईचीच भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.