Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh | ‘या’ अभिनेत्यासाठी धर्मेंद्र यांच्या मुलीने सोडली रणवीरची साथ; कॉलेजमधील प्रेकप्रकरण चर्चेत

दीपिकाच्या आधी कॉलेजच्या दिवसांत एका स्टारकिडवर रणवीरचं प्रेम जडलं होतं. रणवीरच्या कॉलेजच्या दिवसांतील हे प्रेमप्रकरण फार कमी लोकांना माहीत असेल. ही स्टारकिड दुसरी-तिसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी आहे.

Ranveer Singh | 'या' अभिनेत्यासाठी धर्मेंद्र यांच्या मुलीने सोडली रणवीरची साथ; कॉलेजमधील प्रेकप्रकरण चर्चेत
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 11:14 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच लव्ह-स्टोरी आहेत, ज्यांच्याविषयी चाहत्यांना फार क्वचित माहीत असेल. अभिनेत्री रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. ‘राम-लीला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली आणि जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. मात्र दीपिकाच्या आधी कॉलेजच्या दिवसांत एका स्टारकिडवर रणवीरचं प्रेम जडलं होतं. रणवीरच्या कॉलेजच्या दिवसांतील हे प्रेमप्रकरण फार कमी लोकांना माहीत असेल. ही स्टारकिड दुसरी-तिसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची छोटी मुलगी अहाना देओलच्या प्रेमात रणवीर अक्षरश: वेडा होता.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र ईशाची धाकटी बहीण अहाना नेहमी लाइमलाइटपासून दूर राहिली. मात्र कॉलेजमध्ये असताना अहानाचं नाव बॉलिवूडमधल्या दोन हँडसम हंकसोबत जोडलं गेलं होतं. खुद्द रणवीर सिंगने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अहानाविषयी खुलासा केला होता. रणवीरने सांगितलं की अहानाने त्यांच्या लाँग टर्म रिलेशनशिपला दुसऱ्या व्यक्तीसाठी सोडलं. जवळपास चार ते पाच वर्षे रणवीर अहानाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मात्र अहानाने ज्या व्यक्तीसाठी रणवीरला सोडलं, ती व्यक्ती आदित्य रॉय कपूर असल्याचं म्हटलं जातं. आजही इन्स्टाग्रामवर रणवीर सिंग आणि आदित्य रॉय कपूर हे अहाना फॉलो करतात.

हे सुद्धा वाचा

अहाना देओलने 2014 मध्ये दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोहराशी लग्न केलं. 2015 मध्ये तिने मुलाला जन्म दिला त्यानंतर 2020 मध्ये अहाना जुळ्या मुलींची आई झाली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अहाना आणि वैभवने लग्नाचा नववा वाढदिवस साजरा केला. तर दुसरीकडे रणवीर सिंगने 2018 मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणशी लग्न केलं. अभिनेता आदित्य रॉय कपूरचं नाव सध्या चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेशी जोडलं जात आहे. या दोघांना अनेकदा डिनर डेटवर एकत्र जाताना पाहिलं गेलं आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.