Dharmendra | ‘ती’ घटना ठरली कारणीभूत नाही तर, धर्मेंद्र यांचा जावई असता रणवीर सिंग
धर्मेंद्र यांच्या लेकीसोबत होते अभिनेता रणवीर सिंग याचे 'प्रेमसंबंध'... अनेक वर्षांचं दोघांचं नातं कोणामुळे तुटलं? नाही तर, धर्मेंद्र यांचा जावई असता रणवीर सिंग...
मुंबई | 18 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर्स, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोट… एक काळ असा होता जेव्हा अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होते. पण आता त्यांच्या मुलांच्या प्रेम प्रकरणांची तुफान चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा रंगत आहे अभिनेते धर्मेंद्र यांची लहान मुलगी अहाना हिच्या अफेअरबद्दल. अहाना आणि अभिनेता रणवीर सिंग यांचं नातं दिर्घ काळ टिकलं असतं तर, आज रणवीर देओल कुटुंबाचा जावई असता. पण तसं काही झालं नाही. दोघांमध्ये एक व्यक्ती आली आणि अहाना आणि रणवीर यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली.
अभिनेता रणवीर सिंग आणि अहाना आज त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असले तरी, जीवनातील खास व्यक्तीला विसरणं फार कठीण असतं. सध्या चर्चा रंगत आहे अहाना आणि रणवीर यांच्या लव्हस्टोरीची. पण दोघांनी कधीही नात्याची कबुली सर्वांसमोर दिली नाही.
पण कॉफी विथ करणच्या शोमध्ये रणवीर याने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये रणवीर एक्स-गर्लफ्रेंडचं नाव न घेता म्हणाला, ‘जवळपास पाच वर्षांचं आमचं रिलेशनशिप होतं. तिने आदित्य रॉय कपूर याच्यासाठी मला सोडलं…’
पुढे रणवीर म्हणाला, ‘ज्यूनियर कॉलेजमध्ये असताना अनेक मुली आदित्य याच्यावर फिदा होत्या. मुलींमध्ये आदित्यची क्रेझ होती. आता त्या मुलीचं लग्न झालं आहे. तिला मुलं देखील आहेत. पण मी तिच्यावर प्रचंड प्रेम करायचो. तिने आदित्यसाठी मला सोडलं…’ असं रणवीर नाव न घेता म्हणाला.
रिपोर्टनुसार, एक काळ असा होता, जेव्हा रणवीर आणि अहाना एकमेकांच्या फार जवळ होते. दोघांच्या मित्रांचा ग्रुप देखील एकच होता. अहाना धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लहान मुलगी आहे. अहाना हिचं लग्न वैभव वोहरा यांच्यासोबत झालं आहे. अहाना आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
तर दुसरीकडे, रणवीर देखील त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. २०१८ मध्ये रणवीर याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत लग्न केलं. दरम्यान, रणवीर आणि दीपिका यांचं घटस्फोट होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण यावर दोघांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.