Ranveer-Deepika: रणवीर-दीपिकाचा किसिंग सीन सुरु असताना खिडकीतून दगड फेकला, तरी पण..

रणवीर-दीपिकाच्या किसिंग सीनचा किस्सा; तेव्हाच भन्साळींना लागली होती चुणूक

Ranveer-Deepika: रणवीर-दीपिकाचा किसिंग सीन सुरु असताना खिडकीतून दगड फेकला, तरी पण..
Ranveer Singh and Deepika PadukoneImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 2:25 PM

मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा होती. किंबहुना याच चित्रपटात एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. चित्रपटानंतर रणवीर-दीपिकाने पाच वर्षे एकमेकांना डेट केलं आणि 2018 मध्ये लग्नगाठ बांधली.

राम लीलाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सर्वांत आधी रणवीर-दीपिकामध्ये रोमँटिक कनेक्शन दिसलं. बऱ्याच काळानंतर एका मुलाखतीत रणवीरने सेटवरील हा किस्सा सांगितला होता. दीपिका आणि रणवीर चित्रपटातील एका दृश्याचं शूटिंग करत होते. त्याचवेळी भन्साळींना त्यांच्यातील खरी केमिस्ट्री दिसली होती.

हे सुद्धा वाचा

अनेकदा दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही तो सीन कलाकाराच्या डोक्यात चालूच राहतो. त्या भावना कलाकाराच्या मनात तशाच राहतात. ही गोष्ट समजावताना रणवीरने ‘राम लीला’ या चित्रपटाचा उल्लेख केला.

फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या या मुलाखतीत रणवीर म्हणाली, “मला राम लीलाच्या सेटवरील एक किस्सा आठवतोय. राम आणि लीला यांचा किसिंग सीन होता. भन्साळी यांच्या चित्रपटात फारच कमी व्हिज्युअल इफेक्ट्स असतात. अधिकाधिक खरेपणा दाखवण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे किसिंग सीनदरम्यान खिडकीतून एक वीट फेकली जाणार होती आणि त्याने आम्ही दचकणार होतो.”

“तो सीन सुरू असताना खिडकीतून वीट फेकली जाते, काचा तुटतात. तरीसुद्धा पहिल्याच टेकमध्ये मी आणि दीपिका त्या सीनमध्ये आकंठ बुडालो होतो. ती वीट खिडकीतून आत पडली होती. तेव्हा भन्साळींना समजलं होतं, की आमच्यात काहीतरी शिजतंय”, असं त्याने पुढे सांगितलं.

राम लीला या चित्रपटानंतर रणवीर-दीपिकाने बाजीराव-मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.