रणवीर सिंह अर्थिक अडचणीत? अभिनेत्याने थेट मुंबईतील विकल्या 2 अपार्टमेंट, चाहते हैराण, वाचा काय घडले
बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणवीर सिंह हा सोशल मीडियावर सक्रिय असून खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंह हा कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंह याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, रणवीर सिंह याचे चित्रपट फार काही धमाका करू शकत नाहीत, सतत त्याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. रणवीर सिंह हा अर्थिक अडचणीमध्ये सापडला असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. इतकेच नाही तर नुकताच रणवीर सिंह याने खूप मोठा निर्णय घेतलाय. रणवीर सिंह याने चक्क त्याचे मुंबईमधील दोन अपार्टमेंट विकले आहेत.
रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला फार काही धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे रणवीर सिंह याच्यासोबत चित्रपटाची टीम आणि रोहित शेट्टी हा देखील चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. हा रणवीर सिंह याच्यासाठी मोठा झटका नक्कीच होता.
आता रणवीर सिंह याने मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या आलिशान बिल्डींगमधील त्याचे दोन अपार्टमेंट विकले आहेत. रणवीर सिंह याने ते अपार्टमेंट 2014 मध्ये खरेदी केले. हे अपार्टमेंट विकल्यानंतर रणवीर सिंह याला 15.25 कोटी रूपये मिळाले. गोरेगावच्या ओबेरॉय एस्क्वाइट स्थित हे अपार्टमेंट होते. 1,324 चौरस फूट असे हे अपार्टमेंट होते.
विशेष म्हणजे एकूण सहा पार्किंग जागा देखील या अपार्टमेंटला मिळाल्या होत्या. रणवीर सिंह याने हे अपार्टमेंट विकल्यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रणवीर सिंह हा तंगीमध्ये असल्याचे देखील अनेकांनी सांगितले आहे. मात्र, रणवीर सिंह याने अपार्टमेंट विकण्याचे कारण अजूनही सांगितले नाहीये.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान याच्या बंगल्याजवळच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आलिशान असे अपार्टमेंट खरेदी केल्याची जोरदार चर्चा दिसली. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे करण जोहर याच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी आपल्या रिलेशनबद्दल मोठा खुलासा करताना दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दिसले. यानंतर अनेकांनी थेट दीपिका पादुकोण हिला खडेबोल देखील सुनावले.