प्रेग्नेंट अभिनेत्री करत होती शो होस्ट, हैराण झाला रणवीर सिंग, बेबी बम्प पकडलं आणि…

Ranveer Singh : प्रेग्नेंट अभिनेत्रीचं बेबी बम्प पकडून रणवीर सिंग असं काय म्हणाला, ज्यामुळे अभिनेत्री भावुक झाली आणि...; एका मुलाखतीत अभिनेत्रीने केलाय मोठा खुलासा... सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा...

प्रेग्नेंट अभिनेत्री करत होती शो होस्ट, हैराण झाला रणवीर सिंग, बेबी बम्प पकडलं आणि...
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 9:53 AM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातून कायम मोठ्या आणि हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अभिनेता रणवीर सिंग याच्या नावाचा उल्लेख करत मोठा खुलासा केला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे. रणवीर सिंग याच्याबद्दल बोलणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौहर खान आहे.

गौहर खान सध्या ‘झलक दिखला जा 11’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. गौहर शोमध्ये होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गौहर खान हिने तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. रणवीर सिंग याच्याबद्दल देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रेग्नेंट असताना देखील काम करत होती. एवढंच नाही तर मी आठ महिन्यांची प्रेग्नेंट होती तेव्हा देखील काम करत होती. शुटिंग सुरु होती. मला होस्टींग करायला प्रचंड आवडतं. होस्टींगच माझं पहिलं प्रेम आहे. मी फूटबॉल वर्ल्ड कप देखील होस्ट केलं आहे…’

हे सुद्धा वाचा

‘अनेक लाईव्ह शो देखील केले आहेत. लाईव्ह इव्हेंट दरम्यान रणवीर सिंग याला अनेकदा भेटली. जवळपास तीन – चार वेळा मी रणवीर याला भेटली. प्रेग्नेंसीच्या सातव्या महिन्यात देखील रणवीर याने मला काम करताना पाहिलं. तेव्हा तो हैराण झाला. रणवीर याने माझ्या बेबी बम्पवर हात ठेवला आणि आईसारखाच रॉकस्टार हो असं म्हणाला…’

‘रणवीर सिंग माझ्या बाळासाठी असं म्हणाला तेव्हा काही क्षणासाठी मी भावुक झाली…’ असं देखील गौहर खान म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौहर खान हिची चर्चा रंगलेली आहे. गौहर खान हिने 10 मे 2023 रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीच्या मुलाचं नाव झेहान असं आहे.

मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री लाईमलाईटपासून दूर होती. पण आता अभिनेत्रीने नव्याने कामाला सुरुवात केली आहे. ‘झलक दिखला जा 11’ शोमध्ये गौहर होस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौहर खान आणि तिच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

गौहर खान हिने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे आणि मुलाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.