Ranveer Singh | ‘संस्कारी आहे…’, सर्वांसमोर रणवीरने पत्नीला केलं किस, आईच्या पडला पाया.. व्हिडीओ व्हायरल
पत्नी दीपिका पादुकोण हिला पाहिल्यानंतर सर्वकाही विसरला रणवीर सिंग; सर्वांसमोर पत्नीला केलं किस आणि आईचे घेतले आशीर्वाद... अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल...
मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत असतात. दोघं कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. आता देखील असंच काही चित्र चाहत्यांना दिसलं. बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा याच्यासाठी रणवीर रॅम्प वॉक करताना दिसला. शोमध्ये पतीचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील पोहोचली होती. सध्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपिकाला पाहिल्यानंतर रणवीर देखील प्रचंड आनंदी झाला. शोमध्ये फक्त दीपिका पादुकोणच नाही तर, अभिनेत्याच्या आईने देखील हजेरी लावली होती. शोमधील अभिनेत्याचा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.
व्हिडीओ मनिष मल्होत्रा याच्या शोसाठी रॅम्पवॉक करताना रणवीर प्रचंड उत्साही दिसत होता. सर्वांसमोर वॉक करत असताना अभिनेत्याला पत्नी दीपिका दिसली आणि अभिनेता सर्वकाही विसरला. रणवीर वॉक करत दीपिका जवळ गेला आणि पत्नीला किस केलं. एवढंच नाही तर, अभिनेत्याने पत्नीच्या शेजारी बसलेल्या आईचे आशीर्वाद देखील घेतले.
View this post on Instagram
अभिनेत्याचा खास अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ कमेंट करत चाहता म्हणाला, ‘संस्कारी आहे…’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दीपिकासाठी कायम रणवीर असं काही खास करत असतो…’ सध्या रणवीरच्या व्हायरल व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मनिष मल्होत्रा याच्या शोमध्ये जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी देखील लेक ईशा अंबानी यांच्यासोबत पोहोचले होते. वॉक करत असताना अभिनेत्याने मुकेश अंबानी यांची देखील भेट घेतली. मुकेश अंबानी आणि रणवीर सिंग यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रणवीर याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २८ जुलै रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका आलिया – रणवीर यांच्या प्रेमकहाणी भोवती फिरत आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या आलिया आणि रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.