Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीसाठी रणवीरने स्वत: साधला पॉर्नस्टारशी संपर्क; म्हणाला..

अभिनेता रणवीर सिंहची एका पॉर्नस्टारसोबतची जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत त्याने ही जाहिरात केली असून यासाठी खुद्द रणवीरनेच त्याच्याशी संपर्क साधल्याचं समजतंय.

'त्या' वादग्रस्त जाहिरातीसाठी रणवीरने स्वत: साधला पॉर्नस्टारशी संपर्क; म्हणाला..
जॉनी सिन्स, रणवीर सिंहImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:41 PM

मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रणवीर सिंह हा सतत त्याच्या फॅशन आणि कामात विविध प्रयोग करताना दिसतो. म्हणूनच त्याला चाहते ‘सर्वांत हटके’ असंही म्हणतात. अनेकदा रणवीरने असं काही केलंय, ज्याची प्रेक्षकांनी कल्पनासुद्धा केली नसेल. सध्या अशाच एका गोष्टीमुळे तो तुफान चर्चेत आला आहे. यावेळी त्याने थेट पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत एक जाहिरात केली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर विविध प्रतिक्रियासुद्धा आल्या आहेत. इतकंच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी रणवीर आणि जॉनी सिन्सच्या या जाहिरातीवर आक्षेपसुद्धा घेतला आहे. अशातच या सेक्शुअल हेल्थशी निगडीत जाहिरातीसाठी खुद्द रणवीरनेच जॉनीशी संपर्क साधल्याचं कळतंय.

रणवीर आणि जॉनीची ही जाहिरात सेक्शुअल हेल्थशी संबंधित गोळ्यांची आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा रणवीरला या जाहिरातीची ऑफर मिळाली, तेव्हा तो लगेचच त्यासाठी तयार झाला होता. जेव्हा त्याला समजलं की या जाहिरातीसाठी जॉनी सिन्सलाही विचारलं जाणार आहे, तेव्हा त्याची उत्सुकता आणखी वाढली. या ऑफरविषयी जॉनीकडे कशाप्रकारे विचारणा करायची, याचा विचार जेव्हा जाहिरात कंपनी करत होती, तेव्हा रणवीरने त्याच्या टीमला सांगितलं की इन्स्टाग्रामवर जॉनीशी संपर्क साधा. यानंतर एका आठवड्यात जॉनीने त्याचा करार साईन केला.

हे सुद्धा वाचा

रणवीरने आधी जॉनीसोबत काही सर्वसामान्य विषयांवर चर्चा केली. या दोघांमध्ये एकमेकांच्या कामाविषयी थोडंफार बोलणं झालं होतं. त्यानंतर रणवीरने जाहिरातीची संकल्पना जॉनीने सांगितली आणि ते ऐकताच तो जाहिरातीसाठी तयार झाला. यानंतर शूटिंगसाठी तो दोन दिवस भारतात आला होता. रणवीर आणि जॉनीची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या जाहिरातीला एका मालिकेच्या स्टाइलमध्ये शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे एका अर्थाने मालिकांची आणि टीव्ही इंडस्ट्रीची खिल्ली उडवल्याची तक्रार काही टीव्ही कलाकारांनी केली आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणवीर आणि जॉनीच्या या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘हे सर्वांत अनपेक्षित कोलॅबरेशन आहे. मी स्थानिक फिल्म इंडस्ट्रीतून माझ्या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोक त्याला छोटा पडदा असंही म्हणतात. जिथे सर्वसामान्य लोक बातम्या, क्रिकेट आणि सर्व बॉलिवूड चित्रपटांसह बरंच काही पाहतात. आता ही सर्वांत अनपेक्षित रिल पाहिल्यानंतर मला त्यातून टीव्ही इंडस्ट्रीचा आणि टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्यांचा अपमान केल्याचं जाणवतंय. कारण आम्हाला नेहमीच कमी लेखलं जातं आणि तशीच वागणूक दिली जाते. कलाकारांना खरंच मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा असते, पण आम्हाला अशी वागणूक मिळते. प्रत्येकजण खूप मेहनतीने काम करतो. पण मला माफ करा टीव्ही शोजमध्ये हे असं सर्व काही दाखवलं जात नाही. हे सर्व मोठ्या पडद्यावर होतं’, असं तिने लिहिलं होतं.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.