Ranveer Singh | ‘या’ क्रिकेटरला किस घेताना दिसला रणवीर सिंह, अभिनेत्याने थेट म्हटले की…
बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणवीर सिंह याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतायंत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) हा कायमच चर्चेत असतो. रणवीर सिंह याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणवीर सिंह हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी मन्नत बंगल्याच्या अगदी जवळ एक आलिशान असे घर खरेदी केले. विशेष म्हणजे या घराची किंमत आज कोट्यवधी रूपयांच्या आजपास आहे. रणवीर सिंह हा नेहमीच पत्नी दीपिका पादुकोण हिच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
रणवीर सिंह याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खास धमाका करताना दिसत नाहीयंत. रणवीर सिंह याचे एका मागून एक असे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. याला राॅकी आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट अपवाद ठरलाय. या चित्रपटात रणवीर सिंह याच्यासोबत आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडली.
रणवीर सिंह याने नुकताच दोन अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. रणवीर सिंह याने शेअर केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. रणवीर सिंह याने थेट महेंद्र सिंह धोनी याच्यासोबत खास फोटो शेअर केले.
View this post on Instagram
इतकेच नाही तर थेट रणवीर सिंह हा महेंद्र सिंह धोनी याच्या गालावर किस करताना दिसतोय. हे फोटो शेअर करत रणवीर सिंह याने खास कॅप्शन देखील शेअर केले. रणवीर सिंह हा महेंद्र सिंह धोनी याचा मोठा चाहता आहे. रणवीर सिंह याने धोनीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, माझा माही…माझा हीरो…
या फोटोमध्ये रणवीर सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची मैत्री स्पष्टपणे दिसतंय. रणवीर सिंह याच्या चाहत्यांना हा फोटो आवडल्याचे दिसत आहे. रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी रणवीर सिंह याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी याने केली.