‘फेक बेबी बंप’ म्हणत दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रणवीरचं सडेतोड उत्तर; म्हणाला ‘बुरी नजर..’

फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गुड न्यूज दिली होती. येत्या सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. मात्र गरोदरपणात तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. यावर अखेर रणवीरने अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

'फेक बेबी बंप' म्हणत दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रणवीरचं सडेतोड उत्तर; म्हणाला 'बुरी नजर..'
Ranveer Singh and Deepika Padukone Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 10:55 AM

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या गरोदरपणामुळे खूप चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी जेव्हा मुंबईत मतदान झालं, तेव्हा ती पती रणवीर सिंहसोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली होती. तेव्हा पहिल्यांदा दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यावरूनही काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘फेक बेबी बंप’ म्हणत नेटकऱ्यांनी दीपिकावर टीका केली. यानंतर दीपिका तिच्या ब्युटी ब्रँडच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली, तेव्हासुद्धा पुन्हा एकदा तिच्या बेबी बंपवरून चर्चा सुरू झाली. आता रणवीरने अप्रत्यक्षपणे कमेंट करत ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे.

शनिवारी रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दीपिकाचे फोटो शेअर करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ‘माय सनशाइन’ असं त्याने तिच्या फोटोंवर लिहिलं. या फोटोंमध्ये दीपिका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. त्यापुढील फोटोवर रणवीरने लिहिलं, ‘उफ्फ! क्या करू मैं? मर जाऊ?’ तर दीपिकाच्या शेवटच्या फोटोवर त्याने थेट लिहिलं, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला!’ रणवीरची ही शेवटची कमेंट ट्रोलर्ससाठीच असल्याचं म्हटलं जात आहे.

रणवीरची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

या ट्रोलिंगदरम्यान ज्येष्ठ पत्रकार फाये डिसूझा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं. ‘प्रिय सोशल मीडिया, दीपिका पादुकोण तिचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडली होत. तिने तिच्या शरीरावर किंवा प्रेग्नंसीवर तुमचा फीडबॅक मागितला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूवर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. फाये डिसूझा यांच्या पोस्टला आलिया भट्ट, तिची बहीण पूजा भट्ट, शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांनी लाइक केलं होतं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....