घटस्फोटानंतर कोंकनाशी कसं आहे नातं? पहिल्यांदाच व्यक्त झाला रणवीर शौरी

अभिनेता रणवीर शौरी आणि अभिनेत्री कोंकना सेन शर्मा यांच्या घटस्फोटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. आता रणवीर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. यावेळी तो पहिल्यांदा पूर्व पत्नीसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

घटस्फोटानंतर कोंकनाशी कसं आहे नातं? पहिल्यांदाच व्यक्त झाला रणवीर शौरी
अभिनेता रणवीर शौरी आणि अभिनेत्री कोंकना सेन शर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 10:09 AM

अभिनेता रणवीर शौरी हा ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये पूर्व पत्नी आणि अभिनेत्री कोंकना सेन शर्माबद्दल व्यक्त झाला. घटस्फोटानंतर पत्नीसोबतचं नातं कसं आहे, याविषयीचा त्याने खुलासा केला. बिग बॉसच्या घरात रणवीर आणि युट्यूबर अरमान मलिक हे एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. त्यावेळी तो अरमानला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगतो. “घरी मी एकटाच असतो आणि माझा मुलगा हारून हा काही वेळ माझ्यासोबत असतो”, असं तो म्हणाला.

कुटुंबाबद्दल बोलताना रणवीरने अरमानला सांगितलं, “घरी तर मी एकटाच राहतो. म्हणजे अर्धा वेळ माझा मुलगा माझ्यासोबत असतो. माझा 13 वर्षांचा मुलगा अर्धा वेळ त्याच्या आईसोबत आणि अर्धा वेळ माझ्यासोबत घालवतो.” यावेळी अरमानने त्याला विचारलं की तो अजूनही पूर्व पत्नीच्या संपर्कात आहे का? त्यावर रणवीरने स्पष्ट केलं, “मुलाखातर जेवढी गरज असते तेवढंच आम्ही एकमेकांशी बोलतो. मला सध्या तरी कोणत्या नव्या नात्याची गरज नाही. मी माझ्या कामासोबत खुश आहे.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

रणवीर शौरी आणि कोंकना सेन शर्मा यांनी सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं. मार्च 2011 मध्ये कोंकनाने मुलाला जन्म दिला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर त्यांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. तर दहा वर्षांनंतर 2020 मध्ये कोंकना आणि रणवीरने घटस्फोट घेतला. या दोघांनी 2006 मध्ये ‘मिक्स्ड डबल्स’ आणि 2007 मध्ये ‘आजा नचले’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘मिक्स्ड डबल्स’मध्ये काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र रिलेशनशिपविषयी ते जाहीरपणे फारसे व्यक्त झाले नाहीत. 2017 मध्ये कोंकनाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिने दिग्दर्शित केलेल्या ‘अ डेथ इन द गुंज’मध्ये रणवीरने भूमिका साकारली होती. रणवीरला घटस्फोट दिल्यानंतर कोंकनाचं नाव अभिनेता अमोल पराशरशी जोडलं गेलं. या दोघांनी ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.