सुशांतसोबत जे घडलं ते इंडस्ट्रीत.. अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा

अभिनेता रणवीर शौरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला. त्याचसोबत या मुलाखतीत त्याने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावरही टीका केली. एकेकाळी रणवीर हा महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता.

सुशांतसोबत जे घडलं ते इंडस्ट्रीत.. अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा
Sushant Singh Rajput and Ranvir ShoreyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 11:10 AM

मुंबई : 19 मार्च 2024 | अभिनेता रणवीर शौरीने निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश भट्ट यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर होता, मात्र नंतर त्यांना भडकावलं गेलं, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करत माझ्यासोबतही असंच घडल्याचा आरोप त्याने केला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दलही त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. ऑफ द रेकॉर्ड प्रत्येकजण या गोष्टीला स्वीकारेल, असंही तो म्हणाला. रणवीरने आतापर्यंत ‘खोसला का घोसला’, ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘कडवी हवा’, ‘भेजा फ्राय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. एकेकाळी तो महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर शौरी म्हणाला, “माझ्या मनात महेश भट्ट यांच्याविषयी खूप आदर होता. मात्र जोपर्यंत तो किस्सा झाला नव्हता, तोपर्यंतच. मी त्यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होतो. वास्तवात त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता, त्याचा वापर करून ते माझी फसवणूक करत होते. माझ्यासोबत ते दुटप्पी वागत होते.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत सुशांतबद्दल रणवीर पुढे म्हणाला, “सुशांतच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीत वर्क कल्चर आणि गटबाजीवर खुलेपणाने चर्चा होऊ लागली. हा फक्त वादाचा मुद्दा बनला होता. पण मी सांगू इच्छितो की फिल्म इंडस्ट्रीत हे सर्व मोठ्या प्रमाणावर होतं. एखाद्याविरोधात गँग बनवणं, एखाद्याला बाजूला ढकलणं, दुसऱ्याची मदत घेऊन त्याच्यावर वार करणं, एखाद्याच्या करिअरला उद्ध्वस्त करणं.. या सर्व गोष्टी इंडस्ट्रीत घडतात. हे सगळं राजकारण, कॉर्पोरेट आणि मीडियामध्येही होतं. मात्र फिल्म इंडस्ट्री ग्लॅमरस असल्याने सर्वांचं इथे जास्त लक्ष वेधलं जातं.”

रणवीरने सुशांतसोबत ‘सोनचिडिया’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सुशांतसोबतच्या आठवणींना उजाळा देत रणवीर म्हणाला, “मी असं म्हणणार नाही की आम्ही एकमेकांच्या खूप जवळचे होते, पण आमच्यात मैत्री होती. आम्ही एकत्र काम केलं होतं. तो अनेकदा माझ्या घरी आला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो. फिजिक्स विषयामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यावर आम्ही खूप चर्चा करायचो.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.