‘बलात्कार, डान्स बार ही भारतीय संस्कृती नाही’, उर्फी जावेद हिचं चित्रा वाघ यांना उत्तर

तोकड्या कपड्यांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फी जावेद हिचं हिंदू राष्ट्राबाबत मत, चित्रा वाघ यांनी मॉडेलच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यानंतर उर्फी म्हणते महिलांच्या कपड्यांसाठी तालिबानी नियम.

'बलात्कार, डान्स बार ही भारतीय संस्कृती नाही', उर्फी जावेद हिचं चित्रा वाघ यांना उत्तर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 8:43 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल चित्रा वाघ यांच्यात कपड्यांवरुन वाद सुरु आहे. चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, असं म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी केली. शिवाय उर्फी जावेद हिच्या सार्वजनिक वावाराला कायम विरोध असेल, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या. अखेर चित्रा वाघ यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई पोलिसांनी उर्फीला शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं. दरम्यान उर्फीने ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

उर्फी ट्विट करत म्हणते, ‘एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांसाठी तालिबानी नियम. हिंदू धर्म फार जुना धर्म असून महिलांचा आदर करणारा आहे. मग तुम्ही कोणच्या धर्माबाबत बोलत आहात?’ असा प्रश्न उर्फीने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

पुढे उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘बलात्कार, डान्स बार आणि राजकारण्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून सर्वांसमोर धमक्या देणं ही भारतीय संस्कृती नाही..’ शिवाय उर्फीने प्राचीन इतिहासातील फोटो ट्विट करत स्त्रीयांच्या वस्त्रालंकारबद्दल सांगितलं आहे.

‘प्राचीन काळी स्त्रीया कसे वस्त्र परिधान करत होत्या पाहा. त्या काळात महिलांना त्यांचे वस्त्र, आभूषणं निवडण्याचा अधिकार होता. तेव्हा महिला खेळ आणि राजकारणात सहभागी होत होत्या. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या.’ असं देखील उर्फी ट्विट करत म्हणाली. सध्या उर्फीचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेतला. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, असं म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. एवढंच नाही, तर मॉडेलने चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.