कॉन्सर्टला लवकर पोहोचण्याच्या नादात रॅपर बादशहाकडून मोठी चूक;15 हजार 500 रुपयांचा भरला दंड
प्रसिद्ध रॅपर बादशहाने एका कॉन्सर्टला वेळेवर पोहोचण्याच्या नादात मोठी चूक केली. या चुकीबद्दल पोलिसांनी बादशहाकडून मोठी रक्कम वसूल केली आहे. ट्रॅफिक नियम मोडल्याबद्दल १५,५०० रुपयांचा दंड भरावा लागला. रविवारी संध्याकाळी करण औजला यांच्या कॉन्सर्टला जात असताना त्यांनी वाहन चुकीच्या रस्त्याने चालवलं. पोलिसांनी त्यांना थांबवून दंड आकारला. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली असून, बादशहाच्या चाहत्यांमध्ये विरोधाभासी प्रतिक्रिया येत आहेत. याआधीही अनेक कलाकारांना अशाच प्रकारच्या नियमभंगासाठी दंड भरावा लागला आहे.
प्रसिद्ध रॅपर बादशाहला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. तसेच तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे त्याच्या एका चुकीमुळे. हो, आपल्या गाण्यांमधून अनेकांना वेड लावणाऱ्या बादहशाच्या हातून एक मोठी चूक घडली आहे. थेट त्याला दंड भरावा लागला आहे.
कॉन्सर्टला लवकर पोहोचण्याच्या नादात मोठी चूक
एका कॉन्सर्टला लवकर पोहोचण्याच्या नादात रॅपर बादशहाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचं समोर आलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला मोठी रक्कम भरपाई म्हणून भरावीही लागली आहे.
रविवारी संध्याकाळी एयरिया मॉलमध्ये गायक करण औजला यांचा कॉन्सर्ट होता. सिंगर बादशाह यामध्ये सहभागी होण्यासाठी निघाला होता. कॉन्सर्टमध्ये लवकर पोहचण्याच्या नादात त्यांने आपली कार चुकीच्या रस्त्यावरुन चालवली. यादरम्यान ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवलं आणि दंड वसूल केला. तसेच यापुढे नियमांचं पालन करण्याची सूचनाही दिल्या. हा कार्यक्रमाला लवकर पोहचण्याच्या नादात त्यांच्याकडून चूक घडली.
इतकी मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागली
कॉन्सर्टला लवकर पोहचण्यासाठी त्यांने ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करत गाडी चुकीच्या मार्गावरुन चालवली. वाहतूक पोलिसांनी त्याला याबद्दल दंड भरण्यास सांगिताला. बादशाहला त्याच्या या चुकीबद्दल तब्बल 15 हजार 500 रुपयांचा दंड भरावा लागला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच बादशाहचे चाहते देखील प्रतिक्रिया देत असून काहीजण त्याच्या बाजुने बोलत आहेत तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत.
अनेक कलाकारांना वाहतूक नियम मोडल्याने दंड भरावा लागला आहे
बादशाहप्रमाणे अनेक कलाकारांना दंड भरावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनलासुद्धा मुंबईत वाहतूक नियम मोडल्याचा फटका बसला होता. तो प्रभादेवी इथे सिद्धिविनायक मंदिरात चालला होता. यावेळी त्याने नो-पार्किंग झोनमध्ये आपली लॅम्बोर्गिनी उरूस पार्क केली होती. वाहतूक पोलिसांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडून दंडाची मोठी रक्कम वसूल करण्यात आली होती.