प्रसिद्ध रॅपरचं फ्लाइटमध्ये सर्वांसमोर अश्लील कृत्य; दिलेलं स्पष्टीकरण वाचून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!
डेसिग्नरला अखेर विमानाच्या मागच्या बाजूस नेण्यात आलं, त्याठिकाणी संपूर्ण प्रवासादरम्यान दोन मित्रांनी त्याच्या वागण्यावर नजर ठेवली. डेसिग्नर दोषी सिद्ध झाल्यास त्याला 90 दिवसांपर्यंत तुरुंगवार आणि 500 डॉलरचा दंड होऊ शकतो, अशी माहिती वकिलांनी दिली.
अमेरिका : हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर डेसिग्नरच्या (Desiigner) बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नुकताच तो एका इंटरनॅशनल फ्लाइटमधून प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान अचानक त्याने सर्व प्रवाशांसमोर स्वत:ची पँट काढली आणि अश्लील कृत्य करू लागला. एका महिला फ्लाइट अटेंडंटसमोर त्याने हे कृत्य केलं. या घटनेनंतर त्याला लगेच ताब्यात घेण्यात आलं आहे. विमानातील त्या अश्लील कृत्यानंतर आता डेसिग्नरने त्याविषयी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.
काय म्हणाला रॅपर?
डेसिग्नरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. नंतर पुढच्या क्षणी त्याने असं काही म्हटलं जे वाचून चाहतेसुद्धा हैराण झाले. इन्स्टा स्टोरीमध्ये रॅपरने लिहिलं, ‘मला माझ्या कृत्याविषयी लाज वाटतेय. कदाचित मी आता कोणाच्याही समोर जाण्याच्या लायक नाही. गेल्या काही महिन्यांपासून मी ठीक नाहीये. परदेशातील एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केल्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मला औषधंसुद्धा दिली होती आणि त्यानंतर मी विमानाने घरी परत जात होतो.’
डेसिग्नरने पुढे लिहिलं, ‘मी गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून सेक्स केलं नव्हतं. त्यामुळेच हे सगळं घडलं. आता मी स्वत:ला फॅलिसिटी सेंटरमध्ये दाखल करतोय. पुढील सूचना मिळेपर्यंत माझे सर्व शोज रद्द करतोय. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.’ डेसिग्नरच्या या कृत्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. टोक्यो ते मिनियापोलीस असा प्रवास तो करत होता. यादरम्यान त्याने विमानात सर्वांसमोर अश्लील कृत्य केलं होतं. ही घटना 17 एप्रिलची असल्याचं म्हटलं जातंय.
— Desiigner (@LifeOfDesiigner) April 21, 2023
रॅपर डेसिग्नरचं मूळ नाव सिडनी रॉयेल सेल्बी ||| असं आहे. डेल्टा फ्लाइटच्या फर्स्ट क्लासमध्ये रॅपरने अनेकदा अश्लील कृत्य केलं, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. यावेळी त्याने हस्तमैथुनही केलं. फ्लाइट अटेंडंड्सनी त्याला अनेकदा तसं न करण्यास सांगितलं होतं. अखेर त्याने न ऐकल्याने रॅपरला FAA चं नियमभंगाचं कार्ड देण्यात आलं. तो कायद्याचं उल्लंघन करतोय हे त्याच्या निदर्शनास आणण्यासाठी त्याला कार्ड दाखवलं गेलं.
डेसिग्नरला अखेर विमानाच्या मागच्या बाजूस नेण्यात आलं, त्याठिकाणी संपूर्ण प्रवासादरम्यान दोन मित्रांनी त्याच्या वागण्यावर नजर ठेवली. डेसिग्नर दोषी सिद्ध झाल्यास त्याला 90 दिवसांपर्यंत तुरुंगवार आणि 500 डॉलरचा दंड होऊ शकतो, अशी माहिती वकिलांनी दिली.