मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर बादशाहने सोडलं मौन; म्हणाला..

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह हातात हात घालून चालताना दिसले. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. त्यावर आता बादशाहने मौन सोडलं आहे.

मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर बादशाहने सोडलं मौन; म्हणाला..
Mrunal Thakur and BadshahImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 1:01 PM

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | दिवाळीनिमित्त बॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटींकडून पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतंच तिच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला फिल्म इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या सर्वांत प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाह आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरने सर्वांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मृणाल आणि बादशाह एकमेकांचा हात पकडलेले दिसून आले. हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी दोघांच्या अफेअरबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यावरून बादशाह आणि मृणाल यांना ट्रोलसुद्धा केलंय. अखेर या सर्व चर्चांवर आता बादशाहने मौन सोडलं आहे.

बादशाहने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. या स्टोरीमध्ये त्याने थेट मृणालचा उल्लेख केला नाही, मात्र त्याचं म्हणणं अफेअरच्या चर्चांबद्दलच असल्याचं म्हटलं जात आहे. ‘प्रिय इंटरनेट, तुम्हाला पुन्हा एकदा निराश केल्याबद्दल खंत आहे. मात्र तुम्ही जसा विचार करत आहात, तसं काहीच नाही’, असं बादशाहने स्पष्ट केलंय. त्याने हे स्पष्ट केलं असलं तरी अफेअरच्या चर्चांवर अद्याप मृणालकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. या पोस्टच्या आधीही बादशाहने आणखी एक पोस्ट लिहिली होती. ‘तो समझने की कोशिश कर, सिक्का उछल गया है’ असं त्याने लिहिलं होतं. मात्र त्यामागचा नेमका अर्थ काय, हे समजू शकलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

मृणाल ठाकूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती ‘पिप्पा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये मृणालसोबतच इशान खट्टर, प्रियांशू पेनयुली, सोनी राजदान यांच्या भूमिका आहेत. तर दुसरीकडे बादशाहने जास्मिनशी लग्न केलं होतं. मात्र 2020 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे. 11 जानेवारी 2017 रोजी जास्मिनने मुलीला जन्म दिला.

बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया आहे. बॉलिवूड चित्रपटांमधील त्याने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याचे स्वतंत्र अल्बमसुद्धा तुफान गाजले आहेत. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये तो शिल्पा शेट्टी आणि किरण खेर यांच्यासोबत परीक्षकाच्या भूमिकेत होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.