Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रॉकी और रानी..’च्या ‘रंधावा पॅराडाइज’मध्ये हत्येनं खळबळ; एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात जो रंधावा पॅराडाइज म्हणून महाल दाखवण्यात आला, त्याच ठिकाणी सोमवारी रात्री एका 55 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. करण जोहरच्या या चित्रपटात भव्यदिव्य महाल दाखवण्यात आला. हा महाल ग्रेटर नोएडामध्ये आहे. त्याच ठिकाणी ही घटना घडली.

'रॉकी और रानी..'च्या 'रंधावा पॅराडाइज'मध्ये हत्येनं खळबळ; एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या
RARKPK's Randhawa ParadiseImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 9:53 AM

नोएडा : 30 नोव्हेंबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने बऱ्याच वर्षांनंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. दमदार कथा, कलाकार, भव्यदिव्य सेट यांसोबतच चित्रपटातील एका गोष्टीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं, ते म्हणजे ‘रंधावा पॅरडाइज’. चित्रपटात करोल बागमध्ये दाखवण्यात आलेलं महालासारखं हे घर खऱ्या आयुष्यात ग्रेटर नोएडा परिसरात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हा फार्महाऊस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या ठिकाणी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

‘रंधावा मॅन्शन’मध्ये मर्डर

ग्रेटर नोएडा पश्चिम, उत्तरप्रदेशमध्ये स्थित गौर मलबरी फार्महाऊसमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं होतं. या चित्रपटात रणवीर सिंहने रॉकी रंधावाची भूमिका साकारली होती. रॉकी रंधावा त्याच्या कुटुंबीयांसोबत या फार्महाऊसमध्ये राहत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा फार्महाऊस फार चर्चेत आला होता. आता एका मर्डर केसमुळे या जागेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फार्महाऊसच्या आत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री एका लग्नसमारंभादरम्यान 55 वर्षीय अशोक यादव यांच्यावर त्यांच्या मुलाच्या सासऱ्याने गोळी झाडली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

55 वर्षीय अशोक यांची हत्या

सेंट्रल नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा पश्चिममधल्या गौर मलबरी फार्महाऊसमध्ये लग्नसमारंभ पार पडला. याच ठिकाणी गाजियाबादचा राहणारा शेखर या व्यक्तीने सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अशोक यांच्यावर गोळी झाडली. अशोक यांचा मुलगा आणि शेखर यांची मुलगी यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू होत्या. घटस्फोटामुळे या दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते.

हे सुद्धा वाचा

फार्महाऊसमध्ये शूटिंग

या फार्महाऊसला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात ‘रंधावा पॅराडाइज’ म्हणून दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाच्या मुख्य शूटिंग लोकेशन्सपैकी हे एक होतं. चित्रपटातील काही भव्य महालाचे सीन्स याच ठिकाणी शूट करण्यात आले होते. या चित्रपटामुळेच हा महाल विशेष चर्चेत आला होता. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणवीरसोबतच जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.