Bigg Boss 17 : ‘यांचं आपापसांतच बिग बॉस चालू’; रश्मी देसाईने लोकप्रिय जोडप्याला फटकारलं

'बिग बॉस 17'चा प्रत्येक एपिसोड हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डोस असतो. प्रत्येक सिझनप्रमाणेच यंदाचा सिझनसुद्धा चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यातच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा या जोडप्याचाही समावेश आहे.

Bigg Boss 17 : 'यांचं आपापसांतच बिग बॉस चालू'; रश्मी देसाईने लोकप्रिय जोडप्याला फटकारलं
Rashami DesaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 5:53 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस 17’चा प्रत्येक एपिसोड हा प्रेक्षकांसाठी भरभरून मनोरंजन घेऊन येत आहे. टेलिव्हिजनवरील या लोकप्रिय शोचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मालिकांमध्ये सुनेच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यात कडाक्याचं भांडणं पहायला मिळालं. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यावर सर्वसामान्य प्रेक्षकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत. बिग बॉसची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईनेही या एपिसोडवर आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

15 ऑक्टोबरपासून बिग बॉसचा सतरावा सिझन सुरू झाला आहे. यामध्ये दोन विवाहित जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. अंकिता लोखंडे-विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट अशा या जोड्या होत्या. या शोच्या सुरुवातीपासूनच रश्मीने तिची खास मैत्रीण अंकिताला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत शोच्या दररोजच्या एपिसोडवर ती तिची मतं मांडताना दिसतेय. रश्मीने याआधी सांगितलं होतं की तिला मन्नारा चोप्राची खेळी आवडत आहे. त्याचसोबत अभिषेक ‘फेक’ वाटत असल्याची टिप्पणी तिने केली होती. आता तिने ऐश्वर्या आणि नील यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

रश्मीने ट्विटरवर लिहिलं, ‘मुनव्वर आणि मन्नारा हे दोघं उत्तम खेळतायत. पण प्रत्येकजण मन्नाराला टार्गेट करत असल्याचं वाटतंय. दुसरीकडे मिस्टर आणि मिसेस नील हे आपापसांतच बिग बॉस खेळतायत असं दिसतंय. विकी भैय्या तर अद्भुत आहेत.’ आणखी एका ट्विटमध्ये तिने अभिषेकचा उल्लेख ‘फेक’ (खोटा) असा केला आहे. आता नव्या प्रोमोनुसार, ऐश्वर्या आणि नील यांना बिग बॉसकडूनही ओरडा बसतो. तुम्ही खेळ नीट समजून घेतला नाही, असं ते म्हणतात.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे मालिकेत ऐश्वर्याने नीलच्या वहिनीची भूमिका साकारली होती.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....